जिल्ह्यातील प्रमुख रस्तांची केली पाहणी; नादुरुस्त रस्ते तातडीने मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू निर्देश

अकोला,दि.17- 

जिल्ह्यातील प्रमुख रस्ते असलेले डाबकी येथील कॅनॉल रोड, फत्तेह चौक या रस्तांची आज पाहणी केली. जिल्ह्यातील प्रमुख रस्ते असून नेहमीच वरदळ असलेल्या या रस्तांचे कामे तातडीने मार्गी लावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी महानगरपालिका यांना दिले.

जिल्ह्यातील प्रमुख रस्तांची पाहणी करताना पालकमंत्री ना. बच्चू कडू बोलत होते. यावेळी महानगरपालिका  आयुक्त कविता व्दिवेदी, उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, मनपा वैद्यकीय अधिकारी फारुख शेख, तहसिलदार सुनील पाटील, पुरुषोत्तम आवारे, सुधाकर फुंडकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रमुख रस्तांची पालकमंत्री बच्चू कडू पाहणी करताना निर्देश दिले की, बऱ्याच वर्षापासून प्रंलबित असलेले कॅनॉल रोड मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव तयार करा. यासाठी जलसिंचन विभाग व महानगरपालिका यांनी समन्वयाने काम करुन रस्तांचे कामे प्राधान्याने मार्गी लावा. तसेच याभागात पाणी टंचाईची समस्या असून नवीन टाकी लावण्यासाठी नियोजन करा. तसेच शहराच्या मध्यभागातील फत्तेह चौक भागातील रस्ते नादुरुस्त असून या रस्तांचे कामे पुर्ण करा, असेही निर्देश यावेळी दिले. डाबकी रोड  येथील श्रीमती कस्तुरबा गांधी महिला रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयाची इमारत कालबाह्य व नागरिकांना सोईसुविधाचा अभाव असल्याने रुग्णालयाचा परिपुर्ण प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश ना. बच्चू कडू यांनी महानगरपालिकाना दिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!