ऐनपुर सिलेंडर स्पोट दुर्घटना ग्रस्त कुटुंबाला खासदार रक्षाताई खडसेंनी दिली भेट

ऐनपुर प्रतिनिधी ( विजय एस अवसरमल)

ऐनपूर ता.रावेर येथे काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरचा स्पोट होऊन श्री.काशिनाथ बारी यांच्या घरातील भांडे, कागदपत्रे, छतावरील पत्रांच खूप नुकसान होऊन त्यांच्या गरीब कुटुंबाचा संसार उघड्यावर आला. सदर ठिकाणी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन महोदय तहसीलदार तसेच गॅस कंपनी अधिकारी यांच्याशी सदर घटनेवर चर्चा करून लवकरात लवकर मदत देऊन सदर कुटूंबाला दिलासा देणेबाबत सूचना केल्या.
या ठिकाणी खासदार रक्षाताई खडसे यांनी भेट दिल्यानंतर श्री काशिनाथ जगन्नाथ बारी व त्यांच्या परीवाराच्या आशा पल्लवीत झाल्या असून गॅस एजन्सी कडून लवकरच मदत होईल अशी आशा त्यांना लागली आहे
यावेळेस युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.श्रीकांत भाऊ महाजन, युवा मोर्चा रावेर तालुका सरचिटणीस शुभम पाटील, कमलेश महाजन, एकनाथ पाटील, सरपंच अमोल महाजन, निलेश जैस्वाल, विनोद महाजन, पंकज पाटील, जयराम कोळी, ज्ञानेश्वर महाजन, लखन पाटील, संदेश महाजन, यश महाजन, शिवम महाजन, अभिषेक पाटील, स्वप्नील मावळे व इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!