धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने दैनिक महाराष्ट्र सारथी वृत्तपत्राचे प्रकाशन..

ऐनपुर प्रतिनिधी – ( विजय एस अवसरमल )

ऐनपुर ता.रावेर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस व विजयादशमी च्या पावन पर्वावर दैनिक महाराष्ट्र सारथी या वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले
सविस्तर वृत्त असे बाबासाहेब डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांनी १४/१०२०२१ रोजी नागांच्या नागभुमीत म्हणजे नागपूर येथे द्वितीय बुद्ध शासनाचे धम्मचक्र गतीमान करत पाच लाख अनुयायांना बौध्द धम्माची दिक्षा दिली म्हणून या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून संबोधले जाते या दिवसाचे औचित्य साधून दि.१५/१०/२०२१रोजी विजयादशमी निमित्ताने ऐनपुर येथे कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर व सतिष अवसरमल यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण केले व वार्डातील जेष्ठ नागरिक सुधिर अवसरमल यांनी दिप व धुप पुजन केले यावेळी भारतीय बॏध्द महासभा चे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य विजय अवसरमल यांनी त्रिसरण पंचशील दिले ग्रामपंचायत माजी सदस्य सुनिल खैरे यांनी मनोगत व्यक्त केले सरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यानंतर दैनिक महाराष्ट्र सारथी वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले दैनिक महाराष्ट्र सारथी चे ऐनपुर प्रतिनिधी विजय एस अवसरमल यांनी दैनिक महाराष्ट्र सारथी चे अंक घरोघरी लावण्याबाबत विनंती केली यावेळी ग्रा.प.सदस्य अनिल जैतकर, सतिष अवसरमल सुनील खैरे, सुधिर अवसरमल, मधुकर धनू अवसरमल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश अशोक अवसरमल,दै.लोकमातमीदार चे ऐनपुर प्रतिनिधी विजय के अवसरमल, विजय भालेराव, चेतन कोंघे, राहुल भालेराव, हेमंत वाघ, प्रथमेश अवसरमल, महेंद्र अवसरमल, स्वप्निल अवसरमल,शुभम अवसरमल,किरण शिरतुरे, राहुल हिवरे व डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील उपासक,उपासीका अबाल वृध्द उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!