दैनिक महाराष्ट्र सारथी च्या रावेर विभागीय कार्यालयाचे उद्घाटन दिमाखात साजरे….
ऐनपुर प्रतिनिधी- ( विजय एस अवसरमल )
ऐनपुर येथून जवळ असलेल्या खिर्डी बु.येथे दैनिक महाराष्ट्र सारथी या वृत्तपत्राच्या रावेर विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुका सुजलाम-सुफलाम असला तरी या तालुक्यातील महत्त्वाचे आर्थिक क्षेत्र म्हणजे शेती ,आणि त्या शेतीच्या विविध समस्या त्यामध्ये पाणी ,विज आरोग्य ,मजूर वर्ग, रस्ते ,कृषी शिक्षण ,सामाजिक सलोखा , अंतर्गत सुव्यवस्था एकुणच शोषित पीडित वंचित यांच्या हक्कासाठी त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून वाचा फोडण्याचे काम दैनिक महाराष्ट्र सारथी निश्चितच भरीव कार्य करीत आहे .आज दि.१५/१०/२०२१ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर खिर्डी बुद्रुक ता रावेर येथे दैनिक महाराष्ट्र सारथी विभागीय कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन संपन्न झाले आजचा दिवस म्हणजे एक विशेष दिवस आहे त्रिवेणी संगम हे आजच्या दिवसाचे महत्त्व आहे विजयादशमी भगवान श्रीराम यांनी आसुरी प्रवृत्तीवर विजय मिळवून आयोध्या मध्ये परत आल्यानंतर जो विजय जल्लोष साजरा केला होता तो दिवस म्हणजे विजयादशमी आजच्या दिवसाचे दुसरे महत्त्व म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र मध्ये वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो .या वाचन प्रेरणा दिनानिमित्त ही तसेच अंधांसाठी संजीवनी ठरलेली पांढरी काठी दिवस या विशेष महत्त्व असलेल्या या दिवसाचे औचित्य साधून खर्डी बु ग्रामपंचायत परिसरामध्ये दैनिक सारथी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन जि.प.सदस्य मा. नंदकिशोर महाजन , मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील निळे निशाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. आनंद भाऊ बाविस्कर दैनिक महाराष्ट्र सारथी चे कार्यकारी संपादक मा.शैलेंद्र ठाकुर उपसंपादक धनंजय महाजन यांचे हस्ते फित कापून करण्यात आले वरील दिनाचे औचित्य साधून उद्घाटन करणे मागचा हेतु म्हणजे अन्यायाला(आसुरी प्रवृत्तीला) वाचा फोडण्याचे काम व जनसामान्यांना विजय मिळवून देण्याचे काम लोकशाहीमध्ये प्रिंट मीडिया प्रामुख्याने करित आहे दुसरे महत्त्व म्हणजे ज्या व्यक्तिमत्वाने भारताचे सर्वोच्च घटनात्मक पद म्हणजे राष्ट्रपती हे पद भूषवले असे महान ऋषितुल्य वैज्ञानिक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला असता असे समजते की रामेश्वरम या त्यांच्या जन्मगावी बालपणी त्यांनी रेल्वेमधून जे पेपर टाकले जायचे त्याची वितरणाचे काम त्यांनी केले आणि त्या पेपर वाचनातूनच त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. तिसरे महत्त्वाचे म्हणजे अंध बांधवांना संजीवनी ठरलेली पांढरी काठी हा दिवस या तीनही दिवसातून प्रेरणा घेऊन दैनिक महाराष्ट्र सारथी वाचन प्रेरणा दिन आतून प्रेरणा घेऊन दैनिकाचे महत्त्व वाचनाचे महत्त्व पांढऱ्या काठी सारखी स्वच्छ प्रतिमा दैनिक महाराष्ट्र सारथी ठेवून या पंचक्रोशीतील प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे काम दैनिक महाराष्ट्र सारथी करणार आहे असे प्रतिपादन रावेर तालुका प्रतिनिधी प्रदिप जी महाराज पंजाबी यांनी केले यावेळी जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन यांनी दैनिक महाराष्ट्र सारथी च्या रावेर विभागीय टिम चे कार्य कौतुकास्पद असून सर्व टिमला पुढील वाटचालीस व विजया दशमी च्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांनी सुध्दा दैनिक महाराष्ट्र सारथी च्या रावेर विभागीय टिम ला उत्कृष्ट कामगिरी केली व विजयादशमी च्या शुभेच्छा दिल्या दैनिक महाराष्ट्र सारथी चे कार्यकारी संपादक शैलेंद्र ठाकुर यांनी आपल्या भाषणात सांगितले की शोषीत,पिडीत, दलीत, वंचितांचा बुलंद आवाज असणार्या दैनिक महाराष्ट्र सारथी चे जळगाव, धुळे नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पहिले विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले या सर्व टिमचे अभिनंदन करतो व त्यांनी सर्व प्रतिनिधी यांना शुभेच्छा दिल्या या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक भाऊ पाटील, आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे निकटवर्तीय छोटू भाऊ पाटील,निळे निशाण संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत भाऊ गाढे, महेश तायडे, सदाशिव निकम सचिन महाले राजू भाऊ सवरने उमेश गाढे सर्व संपादकीय टीम सर्व रावेर विभागीय टीमचे प्रतिनिधी उपस्थित होते.