ऐनपुर येथे गॅस हंडी चा स्पोट घरातील सर्व सामान जळून खाक प्राणहानी टळली मोलमजुरी करणारा परिवार उघड्यावर…
ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)
ऐनपुर येथे दसऱ्याच्या पहाटेच गॅस हंडी चा स्पोट होऊन घराचे व घरातील सामानाचे नुकसान झाले आहे
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील सुशिलाबाई व काशिनाथ जगन्नाथ बारी व दिलीप जगन्नाथ बारी यांच्या एकत्रित राहत असलेल्या घरात सुशिलाबाईयांचे नावे भारत गॅस या कंपनीचा उज्ज्वला गॅस असून आज दि. १५/१०/२०२१ रोजी काशिनाथ बारी यांच्या पत्नी घरात सकाळी ७.३० वाजता गॅस वरती चहा बनवत असताना अचानक गॅस लिकेज झाला आहे हे लक्षात आल्या बरोबर घरातील सर्वांची धांदल उडाली व घरात असलेली सर्व व्यक्ती घराच्या बाहेर निघाले त्याच क्षणी गॅस चा स्पोट झाला व होत्याचे न होते झाले घरावरचे पत्रे उडून गेली घरातील सामानाची नुकसान झाले ऐन दसऱ्याच्या दिवशी कुटुंब उघड्यावर आले आणि घरात खाण्या पिण्याच्या साठी काही शिलक राहिले नाही या वेळेस तहसीलदार उषाराणी देवगुणे ऐनपुर मंडळ अधिकारी जी.एन.शेलकर, मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी विजय शिरसाठ,लक्ष्मी गॅस एजसी रावेर चे मॅनेजर सुनील महाजन सरपंच अमोल महाजन यांनी जागेवर येवून पंचनामा केला त्यात कुटुंबाचे सरासरी १,२७००० / रू.चे नुकसान झाल्याचे नमूद पंचनाम्यात नमूद करण्यात आले यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी तत्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडी प्रमुख मायाताई बारी, ग्रा. प.सदस्य अनिल जैतकर माजी सरपंच भगवान महाजन दिनकर मावळे ज्ञानेश्वर महाजन सुनील खैरे या सह अनेक नागरिक उपस्थित होते .