ताप्ती नदीपात्रात सुरेश माधव कोळी यांच्या जिवंत जलसमाधी आंदोलनाची सांगता..
ऐनपुर प्रतिनिधी – (विजय एस अवसरमल)
ऐनपुर ता.रावेर येथील सुरेश माधव कोळी यांनी त्यांचे पुनर्वसन विभागाचे संबंधित विविध मागण्यांबाबत ऐनपुर येथील सुस्ती परीसरात ताप्ती नदीपात्रात जिवंत जलसमाधी आंदोलन केले
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील रहिवासी सुरेश माधव कोळी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या (दि.१५/०८/२०२१) रोजी जलसमाधी आंदोलन स्थगित केले होते हे जलसमाधी आंदोलन ऐनपुर परीसरात सुस्ती येथे ताप्ती नदीपात्रात दि.०४/१०/२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. सुरेश माधव कोळी यांनी सुरू केले या ठिकाणी ऐनपुर ग्रामपंचायत चे सरपंच अमोल महाजन, ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे, मंडळ अधिकारी शेलकर आप्पा, तलाठी विजय शिरसाठ व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी सुरेश माधव कोळी यांना लेखी पत्र देऊन आश्वासन दिले व आंदोलन सोडवण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर, नजीर दादा, ग्रामपंचायत माजी सदस्य विलास अवसरमल, सुनील खैरे, अतुल पाटील, पृथ्वीराज जैतकर, मनोहर कोळी, संदिप जैतकर, नितिन जैतकर, पंडित जैतकर व ग्रामस्थ उपस्थित होते अशा प्रकारे जिवंत जलसमाधी आंदोलनाची सांगता करण्यात आली.