ऐनपुर ग्रामस्थ व विविध संस्था च्या वतीने डॉ. कुंदन पाटील यांचा सत्कार..

ऐनपुर प्रतिनिधी – ( विजय एस अवसरमल )

ऐनपुर ता.रावेर येथील ग्रामस्थ व गावातील विविध संस्थांच्या वतीने ऐनपूर येथील डॉ. कुंदन पाटील यांचा सत्कार करण्यात आला
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील रहिवासी श्री.व्ही जी पाटील व सौ.मंगलाबाई विश्वनाथ पाटील यांचा मुलगा डॉ. कुंदन पाटील याने वैद्यकीय क्षेत्रातील डी एम कार्डिओलाजी ही ह्रदयरोग शास्त्राची अतुच्च पदवी मिळवली आहे. मुंबई येथील नायर हॉस्पिटल मधून एम बी बी एस चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी केरळ राज्यातील कालिकत येथून डी एम कार्डीओचे शिक्षण पूर्ण केले त्या निमित्ताने ऐनपुर ग्रामस्थ व विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार आज करण्यात आला.अध्यक्षस्थानी राजीव पाटील होते. सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक व परिचय मुख्याध्यापक एन व्ही पाटील सर यांनी केले. डॉ. कुंदन पाटील यांचा वि का सोसायटी, ग्रामपंचायत ,वाचनालय, ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ,दुध उत्पादक संस्था, महादेव मंदिर संस्था, पीक संरक्षण संस्था ,ज्येष्ठ नागरिक मंडळ ,दुर्गादेवी मंडळ, तंटामुक्ती मंडळ ,गुजर युवक मंडळ व रावेर परिसर फार्मर कंपनी यांच्या वतीने शाल ,श्रीफळ ,गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर वैयक्तिक रित्या सुद्धा गावातील ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी डॉ.कुंदन पाटील यांनी आपल्या मनोगतात नियमित अभ्यास करत असताना उच्च ध्येय ठेवा मेहनतीचे फळ मिळत असते. क्षेत्र कोणतेही असो आवड असेल तर जिद्द येते .ध्येय ,आवड, मेहनत यामुळे त्याचं फळ निश्चित मिळत असते. स्वतःच्या आयुष्याबद्दल समाधानी रहा जीवनात आपण निश्चित यशस्वी व्हाल असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास इतर क्षेत्रा पेक्षा जास्त वेळ लागणारा असून यासाठी खूप मेहनत घेणे फार गरजेचे आहे .यावेळी व्यासपीठावर राजीव पाटील ,भागवत पाटील, अमोल महाजन ,दत्तात्रय महाजन, जगन्नाथ पाटील ,काशिनाथ पाटील , व्ही जी पाटील व डॉ कुंदन पाटील,डॉ नीरज पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमास किशोर महाजन, भगवान महाजन , रघुनाथ पाटील, पी एम पाटील, जितेंद्र पाटील ,पांडुरंग पाटील, सुदेश पाटील, राजेंद्र महाजन, कैलास पाटील ,सुनील महाजन ,रफिक शेठ ,गोपाल पाटील,विकास अवसरमल,मुरलीधर पाटील,रविंद्र महाजन,किशोर अप्पा, डॉ सतिष पाटील,आर जे पाटील,शुभम महाजन,आर टी महाजन,रामदास महाजन,यासह ग्रामस्थ उपस्थित होते.वि का सोसायटी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!