“धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमीला साजरा करावा.”… केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे..
ऐनपुर प्रतिनिधी – ( विजय एस अवसरमल )
रावेर येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करणे बाबत भारतीय बौध्द महासभा रावेर शहराध्यक्ष दिपक तायडे सर यांनी आज रोजी आयोजित केलेल्या बैठकीचे अध्यक्षस्थानावरून बोलतांना भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे यांनी वरील आवाहन केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आजपर्यंत तीन वेळा धम्मचक्र प्रवर्तन झाले असून पहिले धम्मचक्र तथागत भगवान बुध्द्धांनी केले, दुसरे धम्मचक्र प्रवर्तन सम्राट अशोकांनी केले त्यावेळी त्यांनी विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र केले असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील 14 ऑकटोबर 1956 रोजी नागपूर येथे तिसरे धम्मचक्र प्रवर्तन केले म्हणून खरा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमीच्या दिवशीच साजरा करावा असे आवाहन केले. “यावेळी बैठकीत यापुढे समाजाचा प्रत्येक कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी 9 वाजता करण्याचा ठराव करण्यात आला”…”तसेच दि.15 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी 9 वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे व सकाळी 10 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर रावेर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तेव्हा समाज बांधवांनी मोठया संख्येने हजर रहावे “…असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला बौद्धाचार्य राजेंद्र अटकाळे, माजी नगरसेवक ऍड. योगेश गजरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ, रमण तायडे सर, मेघराज शेगावकर, गोविंदा लहासे, संकित तायडे, रमण गजरे रोहित गजरे, संम्यक इंगळे, सुमित तायडे, शुभम घेटे, अंकुश गजरे,गोलू घेटे, संजय गजरे,प्रताप घेटे, मनोज घेटे, नरेश गजरे, अमर तायडे, आकाश मेढे, मुन्ना गजरे यांचेसह असंख्य कार्यकर्ते हजर होते. बैठकीची प्रस्तावना व संचलन भारतीय बौद्ध महासभेचे रावेर शहराध्यक्ष दिपक तायडे सर यांनी केले.