ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात शिक्षकांमध्ये हाणामारी..
निंभोरा पोलीस स्टेशन ला अदखलपात्र गुन्हा दाखल
ऐनपुर प्रतिनिधी – ( विजय एस अवसरमल )
ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात शिक्षकांमध्ये हाणामारी झाल्याने निंभोरा पोलीस स्टेशन ला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात दि.३०/९/२०२१ रोजी सकाळी ७.३० ते ८.४५. वा.च्या दरम्यान मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व वकिल यांच्यात हाणामारी झाल्याने निंभोरा पोलीस स्टेशन ला अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. ३०/०९/२०२१ रोजी सकाळी ८.४५वा.सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात रसायनशास्त्र विभागात शिक्षक किरणसिंग नथ्थुसिंग पाटील व वकिल शंतनु जयंत पवार दोन्ही मुळ रहाणार मालेगाव बसलेले असताना किरण पाटील यांच्या पत्नीने मुख्याध्यापक आर जे पाटील यांना सांगितले की माझ्या पतीसोबत असलेले शंतनु जयंत पवार यांनी हाताने इशारा करुन तुला पाहून घेईल असे म्हटले मुख्याध्यापक यांनी उपमुख्याध्यापक सुबोधकुमार चौधरी पर्यवेक्षक प्रमोद रामदास महाजन यांना काय प्रकार आहे याबाबत चौकशी करा असे सांगितले त्यामुळे उपमुख्याध्यापक सुबोधकुमार चौधरी व पर्यवेक्षक प्रमोद रामदास महाजन हे रसायनशास्त्र विभागात गेले त्यावेळी त्या रुममध्ये अनोळखी व्यक्ती बसलेली होती म्हणून तुम्ही कोणाला विचारुन आले असे विचारले असता शिक्षक किरणसिंग नथ्थुसिंग पाटील यांनी उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांची कॉलर पकडून शर्ट फाडून टाकले चापटा बुक्यांनी मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली त्याचबरोबर मुख्याध्यापक श्री आर. जे.पाटील यांना सुद्धा जिवे ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली याबाबत निंभोरा पोलीस स्टेशन ला उपमुख्याध्यापक सुबोधकुमार चौधरी यांनी फिर्याद दाखल केली आरोपी शिक्षक किरणसिंग नथ्थुसिंग पाटील व वकिल शंतनु जयंत पवार यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा ५२४/२०२१ भा.द.वि.कलम ३२३,५०४,५०६,३४,५१०प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे तर दुसर्या गुन्ह्यात फिर्याद शिक्षक किरणसिंग नथ्थुसिंग पाटील यांनी दिल्याने चार जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असून यात सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात रसायनशास्त्र विभागाचे रूममध्ये दि.३०रोजी सकाळी ७.४० वाजेदरम्यान शिक्षक किरणसिंग नथ्थुसिंग पाटील व वकिल शंतनु जयंत पवार हे बसलेले असतांना पर्यवेक्षक प्रमोद रामदास महाजन, मुख्याध्यापक श्री आर.जे.पाटिल, उपमुख्याध्यापक सुबोधकुमार चौधरी व सतिष पाटील या चार जणांनी किरणसिंग पाटील व वकिल शंतनु पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने निंभोरा पोलीस स्टेशन ला फिर्याद किरणसिंग पाटील यांनी दिल्याने अदखलपात्र गुन्हा ५२५/२०२१ भा.द.वि.कलम ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे सदर गुन्ह्याचा तपास रावेर येथील स.पो.नि.यांचे मार्गदर्शन घेऊन निंभोरा पोलीस स्टेशन चे फौजदार काशिनाथ कोळंबे , हे.का.ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे.