ऐनपुर येथील डॉ.कुंदन विश्वनाथ पाटील डी.एम.कर्डीयोलोजी प्रथम श्रेणीत उत्तर्ण..

ऐनपुर प्रतिनिधी – ( विजय एस अवसरमल )

ऐनपुर ता.रावेर येथील सामान्य कुटुंबातील सुपुत्र डॉ.कुंदन विश्वनाथ पाटील यांनी डी.एम.कर्डीयोलाजी प्रशिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे राहणारे सौ.मंगलाबाई विश्वनाथ पाटील व विश्वनाथ गणू पाटील यांचे सुपुत्र डॉ.कुंदन विश्वनाथ पाटील यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कालीकत या केरळमधील प्रख्यात संस्थेमधून डी.एम.कर्डीऑलोजी चे प्रशिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले डॉ.कुंदन पाटील यांनी एम.बी.बी.एस चे प्रशिक्षण मुंबई येथील नायर रुग्णालयात पुर्ण केले व त्यानंतर डी.एन.बी.जनरल मेडीसीन ची पदवी मिळवली त्यांनी NEET-SS या स्पर्धा परीक्षेत देशात ९२ वा क्रमांक मिळवून डी.एम.कर्डीओलोजी या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला होता डी.एम. कर्डीओलोजी ही हृदयरोग शास्त्राची अतिउच्च पदवी असून एकोकर्डीऑग्रफी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी तसेच विविध हृदयविकाराचे उपचार आणि चिकित्सा पद्धती या प्रशिक्षणाचा भाग आहेत अत्यंत कठीण असा हा अभ्यासक्रम पास करणारे डॉ.कुंदन पाटील जिल्ह्यातील मोजक्या डॉक्टरा पैकी एक आहेत त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!