ग्रामीण भागातील मुलेही शिक्षण क्षेत्रात पुढे- एन.व्ही.पाटील
ऐनपुर प्रतिनिधी – (विजय एस अवसरमल मो.नं.८९७५४३६३९९ )
ऐनपूर ता.रावेर येथील सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक पालक सभेत बलवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक एन.व्ही.पाटील यांनी सभेत माता-पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी सभेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी तसेच त्यांच्या ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत असलेल्या अडीअडचणी वरती चर्चा करण्यात आली.मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी प्रास्ताविक तर निकिता चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन पालकांच्या हस्ते करण्यात आले.स्वागत व्यवस्थापक आर.टी. महाजन यांनी केले.सभेतील विषयांची माहिती अक्षय पाटील यांनी दिली.तर वर्षभराचे नियोजन आणि अभ्यासक्रमाबाबत दीपिका बारी यांनी माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना आरती पाटील यांनी दिल्या.पालक व मातांनी शैक्षणिक बाबीवर चर्चा केली.आईच बालकाचे चांगले संगोपन करू शकते असे मत सभेचे अध्यक्ष रामदास महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना मांडले.आभार अश्विनी चौधरी यांनी मानले.व सभेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.