कोविड१९लसीकरण केंद्रावर जि.प.अध्यक्ष मा.रंजनाताई पाटील यांची भेट….

ऐनपुर प्रतिनिधी – (विजय एस अवसरमल मो. ८९७५४३६३९९ )

दि.८/९/२०२१ रोजी रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोविड चे लसीकरण प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी ऐनपुर येथील प्रा.आ.केंद्रासाठी ऐनपुर ग्रामस्थ यांच्या मागणीवरून ऐनपुर गावांसाठी एक हजार कोविशिल्ड चे डोस उपलब्ध करून दिले हे लसीकरण गुर्जर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते या ठिकाणी लसीकरण आरोग्य सेविका राणे बी.बी.सी.एच.ओ.डॉ.वाय.ए.शेख आरोग्य सेवक आर.आर.पाटील यांनी केले त्यावेळी जि.प.अध्यक्ष मा.रंजनाताई पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी प्रा.आ.केंद्राच्या आशा स्वयमसेविका रेखा जैतकर, वर्षा अवसरमल, भारती पाटील, मिना जैतकर प्रिती बारी यांनी फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी सरपंच अमोल महाजन, उपसरपंच पती अतुल पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगन्नाथ शामू पाटील, अनिल जैतकर, डॉ.संदीप चौरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला या लसीकरणा साठी ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!