भावी पिढी समर्थ व सक्षम बनविण्यासाठी शिक्षकांचे कार्य नेहमी मोलाचे. – इकबाल पिंजारी सर
ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल मो.८९७५४३६३९९ )
गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।
भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. कोणतीही व्यक्ती ही कायम विद्यार्थीच असते, असे म्हणतात. प्राथमिक गोष्टी आई शिकवते. समाजात वावरण्यापासून ते मनगट बळगट करण्यापर्यंतचे शिक्षण शिक्षक देत असतात. यानंतर खुल्या जगात गेल्यावर स्काय इज द लिमिट, अशी अवस्था सर्वांची होते.
व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा शिक्षकदिवस असतो. विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।, असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलेच आहे. यावरून शिक्षणाची महती अधोरेखित होते.