ममत्वाच्या अंधारात वंशाचा दिवा..पारायण गाथाही आंसवात बुडाली
ऐनपुर प्रतिनिधी विजय एस अवसरमल
रावेर तालुक्यातील खानापूर येथील एका २६वर्षीय विवाहीतेचा गुरुवारी पुत्ररत्न झाले नंतर मृत्यू झाला अचानक रक्तदाब कमी होऊन अव्याहातपणे अतिरक्तस्राव नियंत्रित न झाल्याने शुक्रवारी पहाटे पावणे दोन वाजता या विवाहितेला जगाचा निरोप घ्यावा लागला या दुर्दैवी घटनेने सारा गाव हळहळला या महिलेला साश्रुनयनांनी निरोप देताना संत श्री ज्ञानेश्वर पारायण ही निशब्द झाले
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश राजाराम वाघ यांच्या कुटुंबातील त्यांचा थोरला मुलगा प्रमोद याचा विवाह लोधीपुरा ता.जिल्हा बुऱ्हाणपूर येथील बाळू महाजन यांची कन्या माधुरी हीचाशी सात वर्षांपूर्वी झाला होता दरम्यान त्यांना एक कन्या रत्न झाले होते पाहिली मुलगी झाली होती म्हणून पुत्रारत्नची अपेक्षा उराशी बाळगून नऊ महिन्यांची मरणयातना सोसून विवाहिता माधुरी हीची गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजता रावेर येथील एका खाजगी रुग्णालयात दुसरी प्रसूती झाली तिने एका पुत्ररत्नाला जन्म दिला त्यामुळे माहेरी व सासरी आनंद झाला असताना क्रूर काळाची दृष्ट नजर लागली प्रसूत झालेल्या विवाहितेचा अचानक रक्तदाब कमी होऊन प्रसूती नंतर होणाऱ्या रक्तस्राव यावर नियंत्रण मिळवणे डॉक्टरांना दुरापास्त झाल्याने डॉक्टरांनी विवाहितेला जळगांव हलवण्याचा सल्ला दिला दरम्यान सावदा येथील दीर्घ अनुभव असलेल्या स्रिरोग व प्रसूती तज्ञ कडे तातडीच्या औषधोपचारासाठी प्रयत्न केले मात्र क्रूर नियातीला ते मान्य नसल्याने प्रसूती नंतर होणाऱ्या अतिरक्तस्राव यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाल्याने डॉक्टरांनी अत्यावस्तेत जळगांव हलवण्याचा सल्ला दिला पती मामा आई व सासू यांनी रुग्णवाहिकेत अत्येअवस्तेत घेवून चाललेल्या विवाहितेची गंभीर होत चाललेल्या प्रकृती पाहता साकेगाव येथील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय चे रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला विवाहितेची अवस्ता पाहून औषधोपचार सुरू केले रक्तस्त्रावावर नियंत्रण मिळविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत यश आले मात्र रक्तदाब कमी कमी होऊ लागल्याने शुक्रवारी पुर्व रात्री दोन वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली एकीकडे पुत्ररत्न झाल्याचा आनंद व त्यावर विरजन टाकणार्या विवाहीतेच्या अकाली मृत्यूमुळे सारा गाव शोकसागरात बुडाला मयत विवाहीता व जन्मतः मातेच्या मात्रूत्वाला मुकलेल्या सुखरूप बाळाला खानापूर येथे आणले तेव्हा उपस्थित ग्रामस्थांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली तर येथील ज्ञानेश्वर पारायणही अंत्ययात्रेमुळे थांबवण्यात आले होते