तथागत भगवान् बुद्धाची शिकवण ही मानवी कल्याणासाठीच आहे……….! विजय एस अवसरमल

ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)

मानव जात ही सामाजिक प्राणी आहे. त्याच्या डोक्यातील मेंदू हा सतत विचारी असतो. त्यावर नियंत्रण ठेवणे कठीणच असते. त्यासाठी त्याच्या जीवनाची सुरुवात बालवयापासूनच संस्कारातून करावयाची असते. त्यासाठी त्या चांगल्या सकारात्मक विचारांची गरज असते. चांगले संस्कार त्यांच्या अंगी नसतील तर तो पशु पेक्षा उपद्रवी प्राणी म्हणून त्याची गणना झाली असती. त्यासाठी त्यास गरज असते चांगला विचारांची व सन्मार्गाची असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक *”””””विजय अवसरमल””””” यांनी समर्पिता रमाई बुध्दविहार सावदा येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रावेर व शहर शाखा सावदा यांच्या विद्यमाने आषाढ पौर्णिमा अर्थात वर्षावास प्रारंभानिमित्त आयोजीत कार्यक्रमात केले.
सकाळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘भगवान गौतम बुध्द व त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन विहारामध्ये सुरू झाले. ग्रंथ वाचक तुषार तायडे सर यांनी पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. आजपासून अर्थात आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या तीन महिने कालावधीत ग्रंथ वाचन सुरू असेल.

           विजय अवसरमल गुरूजी यांनी  गुरुपोर्णिमा आणि वर्षावासाचे महत्त्व याविषयावर आपल्या प्रवचनात बोलतांना सांगितले की,बौद्ध धम्मात पौर्णिमेला फार महत्त्व आहे. कारण भगवान बुद्धाच्या जीवनात ज्या ज्या मंगल घटना घडल्या, त्या पौर्णिमेलाच घडलेल्या आहेत. त्यांच्या जीवनात पहिली पौर्णिमा आली ती आषाढ पौर्णिमा, 
        गुरु कसा असावा याबाबत बुद्धाचे उदाहरण देवून गुरूंचे महात्म्य उपस्थितांना पटवून सांगितले  पुढे  विजय अवसरमल गुरुजी म्हणाले की, 
      भगवान बुद्धांनी भिक्षुंसाठी पावसाळ्याचे तीन महिने त्रास होऊ नये यासाठीच वर्षावास जाहीर केला. भिक्षूने तीन महिने कुठेतरी विहारात, चैत्यस्तूपात आपला वर्षावास करावा. स्थानिक उपासक- उपासिकांना धम्म उपदेश करावा. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे निवास, निवारा.  भगवान बुद्धाने आपला पहिला वर्षावास सारनाथ येथील ऋषीपत्तन येथेच केला. त्यांनी आपल्या जीवनात एकूण ४६ वर्षावास केले. शेवटचा वर्षावास वैशाली येथे केला. याच पौर्णिमेला भगवान बुद्धांनी साठ भिक्षुंचा समूह झाल्यावर संघाची स्थापना केली. अशा कारणांनी  आषाढ पौर्णिमा महत्त्वाची आहे. जगात या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पौर्णिमेपासून तीन महिने प्रत्येक बुद्ध विहारात प्रवचन मालिकांचे आयोजन करावे. उपासक-उपासिकांनी धम्मज्ञानाचा लाभ घ्यावा. सर्वांचे कल्याण होवो ! 

वर्षावास मालिकेचे पहिले पुष्प सावदा .ता. रावेर येथिल रमाई बुद्ध विहारात गुंंफले गेले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा तालुका रावेर चे अध्यक्ष “””अनोमदर्शी तायडे सर”””” हे होते. त्यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून * संघरत्न दामोदरे, ( कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा रावेर) यांच्या हस्ते धुप पूजा करण्यात आली.तसेच विजय अवसरमल ( जिल्हा संघटक) यांनी द्विप प्रज्वलित करून युगपुरुषांना अभिवादन करुन वर्षवास मालिकेचे उद्घाटन केले. या नंतर भारतीय बौद्ध महासभा रावेर तालुका कोषाध्यक्ष तथा बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक “” संघरत्न दामोदरे”” यांनी उपस्थितांना सामूहिकरीत्या त्रिशरण पंचशील दिले.*
यावेळी या समता सैनिक दलाचे माजी तालुकाध्यक्ष बाळू रजाने, मनोज वाघ ( तालुकाध्यक्ष समता सैनिक दल रावेर), *आनंदा वाघोदे,( सचिव- प्रसार, प्रचार व पर्यटन) प्रशांत गाढ़े,(सचिव- संस्कार विभाग ) अश्विनी तायडे ( उपाध्यक्ष- महिला विभाग) *सिद्धांत तायडे,( उपाध्यक्ष- प्रसार, प्रचार व पर्यटन), शिवदास कोचुरे,( तालुका संघटक) राजू बार्हे, (तालुका संघटक), विकास तायडे (तालुका संघटक ), तुषार तायडे सर ( शहराध्यक्ष, सावदा) *अँड सचिन तायडे * 【उपाध्यक्ष – सम्यक विद्यार्थी आंदोलन जळगाव 】, * राकेश बार्हे ,【पोलिस पाटिल 】 अँड राजकुमार लोखंडे , खुशाल निकम गणेश तायडे, टारझन तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अनोमदर्शी तायडे सर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, बुद्ध म्हणतात जर मानवातील संघर्ष आणि दुःख नष्ट करावयाचे असले तर सद्धम्म याचा प्रसार आणि प्रचार करणे आवश्यक आहे. मानवाला सामोरे जाऊन निष्क्रिय आणि गप्प न राहता जगातील मानवाची सेवा करणे आपले कर्तव्य आहे. याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. तथागतांनी सुद्धा सतत जगातील अंधकार ,दुःख, दारिद्र्य अनाचार, दुराचार, या बाबी दूर सारण्यासाठी आणि जगाला सन्मार्गावर आणण्यासाठी बुद्धाने आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करून मानवाला दुःख मुक्त करण्याचा प्रवास सतत 45 वर्ष केला. त्यामानाने आपण काय करतो आहे याचा विचार होणे या ठिकाणी गरजेचे आहे.
“”” संघरत्न दामोदरे”””【कोषाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा रावेर 】 म्हणाले की, तथागत बुद्ध हे सामाजिक आणि नैतिक सुधारणा करणारे पहिले समाज सुधारक आहेत. समतेचे पुरस्कर्ते आहेत. स्त्रिया आणि शूद्र यांची गुलामगिरी तोडणारे ते पहिले क्रांतिकारक आहेत. जनसेवेची आणि जनसंपर्काचे प्रणेते आहेत. कधीही उलट न फिरणारे धम्मचक्र गतिमान करणारे ते पहिले प्रवर्तक आहेत. विचारास प्रवृत्त करणारे विचार प्रवर्तक आहेत. ते “”””स्वयंप्रकाशित”””” असून ““अत्त दीप भव”” असा संदेश देणारे आहेत. बंधुता आणि लोकशाहीचे उदगाते आहेत.
यावेळी कार्यक्रमाला चेतन लोखंडे,( सरचिटणीस सावदा शहर), ,करण तायडे,(ग्रामशाखा अध्यक्ष- कोचुर) शिरीष वाघोदे, (ग्रामशाखा अध्यक्ष वडगाव) , किशोर लहासे ,विनायक वाघोदे, सागर सुरवाडे यांची प्रमुख उपस्थिति होती. आलेल्या सर्व मान्यवरांचा शहर शाखेच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमा देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे रावेर तालुका संघटक शिवदास कोचुरे यांनी केले. सरणंतय घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळी कार्यक्रमाला सावदा येथील बौद्ध उपासक-उपासिका, लहान बालके, व् विशेष अशी महिलांची उपस्थिती होती .भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका शाखा व शहर शाखेच्या च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!