साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला आजपासून सुरुवात

अहमदनगर

शिर्डीतील साईबाबांच्या यंदाच्या पुण्यतिथी उत्सवास सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या प्रथम दिवशी गुरुवारी (दि. 14) पहाटे साडेचार वाजता साईबाबांची काकड झाली. त्यानंतर साईबाबा मंदीरातून साईंच्या फोटोची आणि पोथीची मिरवणुकीने द्वारकामाईत गेली त्यानंतर नंतर तेथे साईचरीत्राच्या अखंड पारायणास सुरुवात झाली आहे.

शिर्डीत साईबाबांनी साठ वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर त्यांचे 15 ऑॅक्टोबर, 1918 रोजी महानिर्वाण झाले. त्यानंतर शिर्डीत दसर्‍याला साईबाबांचा पुण्यतीथी उत्सव साजरा केला जाऊ लागला. यास या वर्षी 103 वर्षे पुर्ण होत आहेत. यावर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळे साध्या पद्धतीने पुण्यतीथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज साईबाबांच्या साईचरीत्राची आणि फोटोची मिरवणूक साई मंदीरातून द्वारकामाई मंदीरापर्यंत काढण्यात आली होती. या साईचरीत्र ग-ंथ कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी तर विणा उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी घेतली होती. ही मिरवणुक द्वराकामाईत पोहचल्यानंतर येथे साईचरीत्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन करत अखंड वाचणास सुरुवात झाली आहे. आज (दि. 14) दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती, सायंकाळी चार ते सहा यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्टेजवर होणार आहे. सायंकाळी सवासहा वाजता धुपारती होईल. रात्री साडेदहा वाजता श्रींची शेजारती होणार आहे. त्यानंतर समाधी मंदिर बंद केले जाईल. पण, श्री साईसच्चरित अखंड पारायण द्वारकामाई मंदिरात रात्रभर चालू राहणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!