पदाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक कार्यावर भर द्यावा – सागर गायकवाड लहु संग्राम तर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

अहमदनगर(नगर प्रतिनिधी)

भारतीय राज्यघटने नुसार शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे असावे असे सांगितले आहे. पण आजही तळागाळातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहचत नाही ते पोहण्यासाठी पदाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक कार्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन सागर गायकवाड यांनी केले.     भिंगार येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून लहुसंग्राम प्रतिष्ठाणच्या वतीने सचिन शिरसाठ,वैरागर सर,विकास चव्हाण यांच्या हस्ते बहुजन चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी लहुसंग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गायकवाड, उपाध्यक्ष राकेश जगधने,पवन वाघमारे,कैलास साळवे,पवन घोरपडे,आकाश साबळे,आकाश लोखंडे,हर्षद शिर्के,तर आरपीआय चे कृपाल भिंगारदिवे,अर्जुन शिंदे,गणेश आडागळे,प्रवीण वाघमारे,ओंकार रोकडे, रोहित नेटके,मारुती नेटके,आकाश तांबे वंचित बहुजन आघाडीचे विशाल साबळे आणि भाजपचे सुनिल सकट आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.पुढे राकेश जगधने म्हणाले की,समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढा देत असताना उपेक्षित दुर्बल घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा योग्य वापर करावा.तर साळवे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!