कान्हेगावमध्ये शेततळ्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अहमदनगर,
जिल्ह्यातील कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैर्वी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना काल (सोमवारी) घडली आहे. दत्ता अनिल माळी (वय 8 वर्ष), चैतन्य अनिल माळी (वय 10 वर्षे), चैतन्य शाम बर्डे (वय 8 वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कान्हेगावातील नागरिकांनी अतुल बाळासाहेब खरात यांच्या शेततळ्यात गणेशमूर्तीचे विसर्जन केले. चैतन्य बर्डेने दत्ता आणि चैतन्य या दोन भावंडांसह शाळेत चाललो, असे घरी सांगितले. परंतु हे तिघे शाळेत न जाता खेळत खेळत थेट शेततळ्यात उतरले. कोणालाही पोहता येत नसल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मुलांचे मृतदेह तळ्यातून बाहेर काढत पंचनामा करून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरुवातीला गणेशमूर्ती शोधण्यासाठी गेल्याची चर्चा होती, परंतु खेळता खेळता मुले तलावाजवळ गेली आणि पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस निरीक्षक साळवे यांनी सांगितले आहे.