भाजपा धर्माच्या नावावर मतं मागण्याचे काम करते – बाळासाहेब थोरात

अहमदनगर,

भारतीय जनता पक्षाचा विचार हा तुमच्या आणि आमच्या हिताचा नाही, हे पहिले लक्षात ठेवले पाहिजे भाजपाने काय केले? काय बदल केला? राम मंदीर बांधले पण पोटाच काय? राम मंदीर बांधल्याने प्रश्न सुटत नाही. लोकांची भुक कशी शमेल हे महत्वाचे आहे. मुलांचे शिक्षण कसे होईल हे महत्वाचे असते. कोरोना काळात आम्ही काळजी घेतली मृत्यूचे आकडे आम्ही लपवले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात 1 लाख 35 हजार मृत्यु झाल्याचे दिसतात. मात्र ज्यांनी लपवले त्यांच्या स्मशानभूमी उघड्या पडल्या ही भारतीय जनता पक्षाची पध्दत आहे. ते धर्माच्या नावावर मतं मागण्याचे काम करत आहे, अशी टिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते संगमनेर तालुक्यात एका कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

’भाजपाने शेतकर्‍यांना मारहाण केली’

भारतीय जनता पार्टी ही शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकांच्या हिताच काम करत नाही. केवळ जातीयवादी राजकारण करते. गेल्या काही महिण्यापासुन शेतकरी आंदोलन करत आहे. या शेतकर्‍यांची भेट पंतप्रधान घेत नाहीत. एक साध लहान मुलगा रडला तरी आपण त्यांची विचार पुस करतो. मात्र या सरकारने थंडीत गार पाण्याचा मारा केला, शेतकर्‍यांना मारहाण केली हे भाजपा आहे. अशी टीकाही यावेळी थोरातांनी केली आहे. दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या कामासाठी अनेक अडचणी आल्या, या सर्व अडचणींवर मात करून आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प आपण राबविला. निळवंडे धरण व कालव्यांची कामे आपल्या हातून होणे हे नियतीच्याच मनात होते. म्हणून पुन्हा सत्तेत आल्यानंतर या कामाला गती दिली. 2022 च्या मध्यापर्यंत दुष्काळी भागाला पाणी देण्याचा आपला प्रयत्न असून यासाठी कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू असल्याचे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहे.

संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे जगदंबा दूध संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले, की निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असणार आहे. या धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनंत अडचणींवर मात करत धरण पूर्ण केले. कालव्यांसाठी मोठे बोगद्यांची कामे मार्गी लावली. मात्र मागील भाजपा सरकारच्या काळात पाच वर्षे कामे थांबली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर जेथे कालव्यांच्या कामावर दोन जेसीबी कार्यरत होते, तेथे आता 35 जेसीबी रात्रदिवस काम करत आहे. दोन्ही कालव्यांची कामे अत्यंत वेगाने सुरू आहेत. ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस चर्चेने आपण मार्ग काढून कामे सुरू ठेवतो. हे कामे लवकरात लवकर पूर्ण करून 2022 च्या मध्यापर्यंत या भागाला पाणी देणे हा आपला ध्यास आहे, असेही थोरात म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!