सगळ्याच बाबतीत कमिशन खाणार्या सरकारला, मंदिरातही कमिशन पाहिजे का? – राधाकृष्ण
शिर्डी (अहमदनगर),
राज्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र भाविकांना दर्शनासाठी खुले करावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज (सोमवारी) राज्यभरात शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. त्याचबरोबरच साईबाबांच्या शिर्डीत देखील भाजपचा कार्यकर्त्यांकडून चार नंबर गेट समोर शंखनाद आंदोलन करण्यात आले आहे. भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राहाता तालुक्यातील कोल्हार येथील श्री भगवती माता मंदिरासमोर शंखनाद आंदोलन केले आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांची सरकारवर टीका –
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हे सरकार आल्यापासुन सगळ्याच गोष्टीसाठी आंदोलन करावे लागत आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी जनतेला आंदोलन करावा लागत असुन देवाची मंदिरे खुले करण्यासाठीसुद्धा आंदोलन करण्याची वेळ आता जनतेवर आली आहे. अधिकार्यांच्या बदल्यांचा मलीदा खाण्यासाठी मंत्रालय चालु तर दुसरीकडे मदिरालय चालु आहेत. मात्र, दुसरीकडे देवाची मंदिरे बंद आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंदिरात गेले तर चालते. मात्र, भाविकांना मंदिरात जाता येत नाही. मंदिरे खुले करा, आम्हाला त्यासाठीही आता न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
राज्याच मंत्रालय बदल्यांचा मलीदा खाण्यासाठी मंत्रालय उघडण्यात आली आहेत. स्टँप ड्युटी कमी करुन बिल्डरांचा फायदा करुन दिला गेला आहे. या सरकारचा सगळा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे असल्याचाही विखे पाटील यावेळी म्हणाले. तसेच प्रत्येक गोष्टीत कमिशन खाण्याची सवय लागलेल्या सरकारला मंदिराकडुनही कमीशन हवे आहे का? असा सवालही विखेंनी केला.