प्रतापगड येथील जिवाजी महाले पुतळ्याचे काम तात्काळ चालू करा
नाभिक सेवा संघाचे रावसाहेब दानवे यांना निवेदन
अहमदनगर –
प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवुन “होता जिवा म्हणून वाचला शिवा” या म्हणिने इतिहासात आजरामर झालेले शुरवीर जिवाजी महाले यांचा पुतळा प्रतापगडावर व्हावा यासाठी २००४ मध्ये महाराष्ट्र शासनाने ठराव मंजूर केला असुन शासन निर्णयानुसार जिवाजी महाले स्मारक समिती ने व ग्रामस्थांच्या सहकार्याने जिवाजी महाले पुतळ्यासाठी कुंभरोषी येथे जागा निश्चित पण केली.पण आजुन साधे भुमिपुजन ही झालेले नाही.म्हणुन केंद्रीय रेल्वेमंत्री मा.श्री.रावसाहेब दानवे साहेबांनी यात लक्ष घालून,शुरविर जिवाजी महाले यांच्या पुतळ्याचे काम तात्काळ चालू करावे या संदर्भात आज केंद्रीय रेल्वेमंत्री मा.श्री.रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव भाले, मराठवाडा हेअर आर्टिस्ट सुनील वरपे, विष्णू वर्षे, दिनेश बोर्डे,किरन राऊत,उमेश जाधव,जिल्हा संपर्क प्रमुख नगर हर्षद शिर्के पाटील यांच्या सह्यानिशी निवेदन देण्यात आले.