‘या’मुळे आमदार निलेश लंकेंनी केली आरोग्य कर्मचार्‍याला मारहाण

अहमदनगर प्रतिनिधी

5 ऑगस्ट

कोरोना संकटकाळात कोविड सेंटरमार्फत रुग्णसेवेसाठी चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग-ेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके एका नव्या वादात अडकले आहेत. त्यांनी पोलिस निरीक्षक आणि अन्य अधिकार्‍यांच्या समोरच पारनेर ग-ामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्‍याला मारहाण केली. त्यांच्यावर लसीकरणाचे टोकन विकत असल्याचा आरोप करून कर्मचार्‍याला घरून बोलावून घेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र पाठवून पारनेर ग-ामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी याची माहिती दिली असून कारवाईची मागणी केली आहे. पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर माने आणि पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासमोरच बुधवारी रात्री साडेदहा वाजता ग-ामीण रुग्णालयात ही घटना घडली आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांना पारनेरच्या वैद्यकीय अधिक्षकांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चार ऑॅगस्ट रोजी रात्री साडे आठ वाजता पारनेर ग-ामीण रुग्णालयात तहसिलदार आणि आरोग्य अधिकार्‍यांच्या आदेशानुसार लसीच्या लाभार्थ्यांना टोकनचे वाटप करण्यात आल्यानंतर रात्री साडेदहा वाजता आमदार निलेश लंके आणि डॉ. कावरे यांनी टोकन वाटप करणारे कनिष्ठ लिपीक राहुल दिलीप पाटील यांना घरून बोलावून घेतले. त्यांच्यावर टोकन विकण्याचे आरोप केला.

आमदार निलेश लंके यांनी त्याची कोणतीही शहानिशा न करता राहुल पाटील यांना मारहाण केली. रुग्णालयात कार्यरत असणार्?या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. उंद्रे व डॉ. अडसुळ यांनाही शिवीगाळ केली. ही घटना गटविकास अधिकारी माने आणि पोलिस निरीक्षक बळप यांच्यासमोर घडली. या घटनेची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असे पत्रात म्हटले आहे. या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक बळप यांनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये या घटनेचे तीव- पडसाद उमटले आहेत. आता वरिष्ठ अधिकारी यासंबंधी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. संबंधित कर्मचार्‍याने अद्याप तक्रार दिलेली नसली, तरी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन जिल्हा मुख्यालयाला लेखी कळवून कार्यवाहीची मागणी केली आहे. यासंबंधी आमदार लंके यांची भूमिका समजू शकली नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!