घोर निराशा! भारतीय तिरंदाज पदकाशिवाय परतले

टोकियो

31 जुलै

ऑॅलिम्पिकच्या तिरंदाजी स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले. या खेळात भारतीय खेळाडूंना एकही पदक जिंकता आलं नाही. अतनु दास पुरूष एकेरी वैयक्तिक फेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. जपानच्या ताकाहारू फुरूकावा हिने अतनुचे आव्हान 6-4 ने संपुष्टात आणले.

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेली महिला तिरंदाज दीपिका कुमारीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. यामुळे अतनु दासच्या कामगिरीवर भारताच्या आशा होत्या. परंतु अतनुच्या पराभवासह भारताच्या आशा धूळीस मिळाल्या.

मागील सामन्यात अतनु दासने लंडन ऑॅलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या ओ जिन हयेक याचा पराभव केला होता. पण लंडन ऑॅलिम्पिक रौप्य पदक विजेता ताकाहारूचा पराभव करण्यात अतनु अपयशी ठरला.

भारतीय तिरंदाजांकडून घोर निराशा

भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी, अतनु दास, प्रविण कुमार, तरुणदीप राय यांना पदक जिंकण्यात अपयश आले. ते सांघिक, वैयक्तिक खेळात आपली लय राखण्यात अपयशी ठरले. दरम्यान, दीपिका कुमारीकडून भारताला पदकाच्या आशा होत्या. परंतु तिचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!