भाऊ.. लवलिनानं उपांत्य फेरी गाठताच पदक पक्कं केलं, पण सिंधूचं का झालं नाही?
टोकियो
31 जुलै
भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत भारताचे आणखी एक पदक निश्चित केलं. ती उपांत्य फेरीत पोहोचली आहे. लवलिनाचा उपांत्य फेरीतील सामना 4 ऑॅगस्ट रोजी होणार आहे. दुसरीकडे भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तिने सरळ सेटमध्ये यामागुचीचा पराभव केला. पण सिंधूचे अद्याप पदक निश्चित झालं नाही. याचे कारण आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
भारताची बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने उपांत्य फेरीत पोहोचताच पदक निश्चित कसे केलं हा प्रश्न सद्या चर्चिला जात आहे. याचे उत्तर आहे, बॉक्सिंगमध्ये तिसर्या स्थानासाठी सामना खेळला जात नाही. म्हणजे उपांत्य फेरीत पराभव होणार्या दोन्ही खेळाडूंना कांस्य पदक दिलं जातं. यामुळे लवलिनाचे पदक पक्के झाले आहे.
बॅडमिंटन खेळात असे होत नाही. या खेळात कांस्य पदकासाठी सामना खेळला जातो. यामुळे सिंधूचे पदक अद्याप निश्चित झालेले नाही.
बॉक्सिंगच्या या नियमाच्या आधारावर बिजिंग ऑॅलिम्पिकमध्ये बॉक्सर विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकलं होतं. तर लंडन ऑॅलिम्पिकमध्ये मेरी कोम याच नियमामुळे कांस्य पदकाची विजेती ठरली.
1948 च्या ऑॅलिम्पिक पर्यंत बॉक्सिंग खेळात तिसर्या क्रमाकांसाठी सामना होत होता. यातील विजेत्याला कांस्य पदक दिले जात होते. परंतु 1952 ऑॅलिम्पिकमध्ये हा नियम बदलण्यात आला. त्यानुसार उपांत्य फेरीत पराभूत होणार्या दोन्ही खेळाडूंना कांस्य पदक दिलं जातं.