देशभरात अटल नवोन्मेष मिशन तर्फे गेले दोन महिने चालू असलेला ‘अटल टिंकरिंग लॅब ( ATL ) टिंकरप्रेनर बूटकॅम्प ’ यशस्वीरीत्या संपन्न झाला

नवी दिल्‍ली, 31 जुलै 2021

नीती आयोग आणि अटल  नवोन्मेष मिशन (AIM) ने देशभरात दोन महिने चालवलेलले आणि डिजिटल कौशल्ये तसेच वैशिष्ट्यपूर्ण उद्योजकता शिकवणारे  हे अशा प्रकारचे  पहिलेच ‘टिंकरप्रनर बूटकॅम्प’ अर्थात प्रशिक्षण  शिबीर होते.  

देशभरातील 32 राज्ये व 298 जिल्ह्यांमधून सुमारे 9,000 उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी या अटल टिंकरप्रेनर शिबिरात सहभाग नोंदवला होता. हा एक विक्रमी आकडा असून यात सुमारे 4,000 विद्यार्थिनींचा समावेश होता.

या शिबिरात 820 अटल टिंकरिंग लॅब्स चा सहभाग होता, तज्ज्ञांची 50 हुन जास्त सत्रे प्रक्षेपित झाली, व ती 4.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पाहिली. या सत्रांमधून 30 पेक्षा जास्त डिजिटल व उद्योजकता कौशल्यांचे प्रशिक्षण दिले गेले.

विद्यार्थ्यांना त्यांच्या घरांच्या आरामदायी वातावरणात सहजपद्धतीने उद्योजकता प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील नवोन्मेष प्रतिभेला जागृत करणे हा या शिबिरांचा उद्देश ‘टिंकरप्रेनर’ या नावातून प्रतीत होतो .

31 मे 2021 ते 1 ऑगस्ट 2021 पर्यंतच्या 90 दिवसांच्या कालावधीत झालेल्या या ए टी एल टिंकरप्रेनर शिबिराच्या द्वारे सहभागी विद्यार्थ्यांना नवीन कल्पनेच्या जन्मापासून ते नवा उद्योग उभारण्याच्या दृष्टीने संपूर्ण प्रशिक्षण दिले गेले.

एटीएल प्रभारी आणि मार्गदर्शकांच्या समवेत विद्यार्थ्यांचे छोटे गट बनवून त्यांना पुढील मार्गदर्शन केले गेले.

अंतिम सत्रात सहभागिंमध्ये तत्पर आणि नवोन्मेषशाली विचारप्रणाली विकसित करण्यावर भर देताना नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष मिशनचे संचालक डॉ चिंतन वैष्णव म्हणाले, कि “ विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषशाली विचारपद्धती विकसित व्हावी, विद्यार्थ्यांचा नवकल्पना ते प्रत्यक्ष उद्योगाच्या उभारणीपर्यंतचा प्रवास ‘प्रयत्न – अपयश- पुन्हा प्रयत्न’ या पद्धतीने कमीतकमी वेळात पूर्ण व्हावा, या दृष्टीने  हा संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला होता.”

या शिबिराच्या शेवटी आभासी / दूरदृश्य प्रणालीने आयोजित केलेल्या समारोप सत्रात इन्फोसिस चे संस्थापक नारायण मूर्ती म्हणाले, “ खरा नेता हा नेहमी एकत्रीकरण करतो, विघटन नाही. आपल्या गटसदस्यांचे मनोधैर्य, महत्वाकांक्षा , आत्मविश्वास व ऊर्जा  वाढवणे ही  नेत्याची प्रमुख जबाबदारी असते .”

देशातील आघाडीच्या  उद्योजकांचे  मार्गदर्शन , पाहुण्या व्याख्यात्यांच्या ६ भाषांमधील( हिंदी, मराठी, तामिळ, तेलगू,मल्याळम व कानडी )  नियमित सत्रे आणि सकारात्मक वातावरण , यामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे तर मिळालेच, शिवाय देशभरातील नवोन्मेषक सहपाठींच्या सतत संपर्काचा फायदाही मिळाला.

या शिबिरात  घेतल्या गेलेल्या सत्रांचे एकत्रीकरण करून ते टिंकरप्रेनर वेब पोर्टलवर उपलब्ध करून दिले गेले आहे, ज्यायोगे इतर विद्यार्थ्यांना ते स्वतःच्या सोयीने पाहता येईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!