राष्ट्रीय ओबीसी महासंघाची(रजि.)अ‍ॅड. डॉ. पी.बी. कुंभार व श्री. सुभाष वासुदेव मुळे यांचे वर महाराष्टाची जब्बाबदरी

कोल्हापूर प्रतिनिधी

30 जुलै

नागरिकांनो !घाबरू नका, काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे . संयम बाळगा . येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात मुख्यमंत्यार्ंनी शाहूपूरी 6 व्या गल्लीतील पूरबाधित राहिवांशांशी अत्यंत आत्मियतेने संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आज कोल्हापूरात आले होते.

आपत्कालीनस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिल्याचे सांगून, 2005 व 2019 पेक्षाही 2021 साली आलेला पूर भयंकर असून शासनाने आम्हाला भरीव मदत करावी अशी अपेक्षा तेथील नागरिकांनी व्यक्त केली.

याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , खा . संजय मंडलिक , खा . धैर्यशील माने, आ.जयंत आसगावकर, आ. ॠतूराज पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार ,मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!