सीबीएसई परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्याबद्दल इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
नवी दिल्ली, 30 जुलै 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्याबद्दल बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांना युवा मित्र म्हणून संबोधित करत पंतप्रधानांनी त्यांना उज्ज्वल, आनंदी आणि निरोगी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
एका ट्विटच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
“इयत्ता बारावी सीबीएसई परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या माझ्या युवा मित्रांचे अभिनंदन . उज्ज्वल, आनंदी आणि निरोगी भविष्यासाठी शुभेच्छा.
ज्यांना वाटते की त्यांनी अधिक परिश्रम केले असते किंवा अधिक चांगली कामगिरी केली असती, त्यांना मला सांगायचे आहे – तुमच्या अनुभवामधून शिका आणि आत्मविश्वास बाळगा. एक उज्ज्वल आणि अनेक संधींनी युक्त असे भविष्य तुमची वाट पाहत आहे. तुमच्यातील प्रत्येकजण प्रतिभेचे ऊर्जाकेंद्र आहे. माझ्याकडून तुम्हाला नेहमीच शुभेच्छा.
यावर्षी बारावीची बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व परिस्थितीत हे यश मिळवले आहे.
या वर्षभरात शिक्षण जगताने अनेक बदल पाहिले. तरीही, त्यांनी नवीन परिस्थितीशी जुळवून घेतले आणि सर्वोत्तम कामगिरी केली. त्यांचा अभिमान आहे! “