कर्नाटकमधील हासनमध्ये बदमाशांनी 30 माडकांची केली हत्या हासन
(कर्नाटक)
29जुलै
कर्नाटकातील हासनमध्ये एक ह्रदयद्रावक घटना समोर आली असून गुरुवारी पहाटे राज्यातील हासन जिल्ह्यातील एका गावात 30 माकडाना मारुन टाकल्याचे दिसून आले. या घटनेत वीस अन्य माकडेही जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे मात्र दोन माकडाना वगळता स्थानिय रहिवाश्यांनी केलेल्या देखभालीनंतर अन्य माकडे बरे झालेत आणि चालू लागले आहेत.
माकडांच्या हत्येचे प्रकरण हे कर्नाटकातील बेलूर तालुक्यातील चौदानहल्ली गावात घडली असून सुरुवातीच्या तपासातून माहिती पडले की माकडांना विषू देऊन मारहाण केली गेली होती.
मृत माकडांना बदमाशांनी पोत्यात बांधून चौडेनहल्लीच्या जवळील रस्त्याच्या बाजूला फेकले होते. घटनेची माहिती ही स्थानिय युवकांनी रस्त्याच्या किनार्याला पडलेल्या पोत्यांना उघडून पाहिल्यानंतर माहिती पडले. या युवकांना 20 माकडे जखमी अवस्थेत आढळून आले. माहिती पडले की पोत्यामध्ये बांधून माकडाना मारण्यात आले होते. पोत्यांना ज्यावेळी उघडण्यात आले होते त्यावेळी काही माकडाना श्वास घेण्यास त्रास होत होता व ते हालचाली करण्यास असमर्थ दिसून आले.
स्थानिय लोकांनी माकडाना पाणी पाजले. वीस माकडापैकी 18 जण पाणी पिऊन स्वस्थ्य झाले आणि ते तेथून निघून गेले. दोन माकडांवर पशु वैद्यकियद्वारा उपचार केला जात आहे आणि दोघांची स्थिती धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.
सहाय्यक वन संरक्षक बेलूरचे वन परिक्षेत्राचे प्रभूनी घटनास्थळाचा दौरा केला. प्रकरणाचा तपास रेंज वनाधिकारी यशमा मचाम्मा व वनपाल डी.गुरुराज करत आहेत.
शंका आहे की बदमांशानी माकडाना विषू देऊन मारहाण करुन मारले. ते एका वेगळ्या ठिकाणाहून माकडाना घेऊन आले होते आणि ज्यावेळी त्याना दुसर्या स्थानावर घेऊन जाण्याची योजना अयशस्वी राहिली तर त्यांनी या सर्वांना मारुन टाकण्याचा प्रयत्न केला.
वन अधिकार्यांनी म्हटले की मृत माकडांना दफण्यासाठी आवश्यक पावले उचलती जातील. मृत माकडांपैकी एकाचे शवविच्छेदन केले गेले आहे आणि प्रारंभिक अहवालामध्ये विष दिल्याचे समोर आले आहे.
या घटनेने जनतेमध्ये संताप दिसून आला आहे आणि याच्याशी संबंधीत बातम्या, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत झाल्या आहेत. वन विभाग घटनेचा तपास करत आहे.