गुजरातमधील आठ प्रमुख शहरांमधील रात्रीच्या संचारबंदीत एक तासांची शिथीलता
गांधीनगर प्रतिनिधी
29जुलै
गुजरात राज्यात कोरोना विषाणूच्या स्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी आठ प्रमुख शहरांमध्ये लागू केलेल्या रात्रीच्या संचारबंदीला कोरोना स्थितीत होत असलेल्या सुधाराला पाहता 31 जुलै पासून अजून एक तासाची शिथीलता देण्याचा निर्णय केला आहे. मात्र सरकारने व्यावसायीकांसाठी लशीचा पहिला डोस या महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्या कार्मचार्यांना देणे अनिवार्य केले आहे.
राज्य सरकारने राज्यातील आठ महानगर पालिका क्षेत्रातील रात्रीच्या संचारबंदी कालावधीत एक तासाची शिथीलता दिली असून रात्रीच्या 9 वाजण्याच्या ऐवजी आता रात्रीच्या 10 वाजे पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. आदेशात म्हटले की प्रत्येक कर्मचार्याला 31 जुलै पर्यंत लस घेणे अनिवार्य असेल.
मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या नेतृवाखाली गुजरात सरकारने बुधवारी कोर कमेटीच्या बैठकीमध्ये कोविड रुग्णांमध्ये उल्लेखनीय घसरणीला पाहता राज्यात अजून शिथीलता देण्याचा निर्णय केला आहे.
राज्यातील अहमदाबाद, राजकोट, सूरत, वडोदरा, जामनगर, भावनगर, गांधीनगर आणि जुनागडमध्ये रात्रीच्या 10 वाजता ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
31 जुलै पासून या शहरांमध्ये रात्री 11 वाजल्या पासून सकाळी 6 वाजे पर्यंत लोकांच्या येण्या जाण्यावर प्रतिबंध प्रभावी राहिल. हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजे पर्यंत उघडे राहू शकतील. जर खुल्या स्थानावर आयोजीत सार्वजनिक कार्यक्रमात 200 पाहुण्यांच्या वर्तमान मर्यादेच्या ऐवजी 400 व्यक्ती यामध्ये सामिल होऊ शकतील.
राज्य सरकारने आगामी गणेश उत्सवासाठी सार्वजनिक ठिकाणांवर उत्सवाची परवानगी देण्याचाही निर्णय केला आहे. या अटीसह मूर्तीची उंची चार फूटापेक्षा कमी असली पाहिजे. या दरम्यान गुजरातने बुधवारी कोविड-19 चे 28 नवीन रुग्ण नोंदविले आणि एक आठवडया पर्यंत कोणत्याही प्रकारच्या घातक घटनेची सूचना मिळालेली नाही.