रोहयोच्या माध्यमातून नाशिक विभागातील 36 हजार 126 मजूरांच्या हाताला काम विभागात रोहयोची एकूण 7 हजार 830 कामे सुरु : उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले

नाशिक प्रतिनिधी

29 जुलै

शेतकरी समृद्ध करण्यासाठी रोहयो अंतर्गत येणारे उपक्रम शासनामार्फत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मागेल तेव्हा काम उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार रोहयोची एकूण 7 हजार 830 कामे सुरु असून या कामावर दिवसाला 36 हजार 126 मजूर काम करत आहे, अशी माहिती उपायुक्त (रोहयो)

डॉ. अर्जुन चिखले यांनी दिली आहे.

नाशिक विभागात रोहयोची एकूण 7 हजार 830 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 36 हजार 126 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 5 हजार 649 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 23 हजार 027 मजूर काम करत आहेत. तसेच 2 हजार 181 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 13 हजार 098 मजूर दिवसाला काम करत आहेत.

जळगांव जिल्ह्यात 1 हजार 673 कामांवर 8 हजार 92 मजूर कामावर

जळगांव जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 673 कामे सुरू असून या

कामांवर दिवसाला 8 हजार 92 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 1 हजार 388 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 6 हजार 453  मजूर काम करत आहेत. तसेच 285 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 1 हजार 639 मजूर काम करत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 866 कामांवर 8 हजार 16 मजूर कामावर

नंदुरबार जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 866 कामे सुरू असून या

कामांवर दिवसाला 8 हजार 16 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 1 हजार 414 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 4 हजार 373  मजूर काम करत आहेत. तसेच 452 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 3 हजार 643 मजूर काम करत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!