आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन 10 ऑगस्टपर्यत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

जळगाव -दि. 30 –

शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन केले आहे. या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (LOGO) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या नियम अटी व पुरस्कार विषयक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https//sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेत भारतातील नागरिक भाग घेऊ शकतात. या स्पर्धेसाठी बोधचिन्ह तयार करुन सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, 2021 असा आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमाकांच्या विजेत्याला 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला 30 हजार रुपये तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला 20 हजार रुपये पारितोषिक प्रदान करण्यात येईल. असे मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!