सावदा पालिकेवर सोलर बसविण्याचे काम सुरु – लाखो रूपयांचे विज बिलाची होणार बचत.

सावदा : प्रतिनिधी
सावदा येथील नगरपालिका आता वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असून येथील
पालिकेच्या ईमारतीवर सोलर पेनल बसविण्याचे काम सुरु झाले आहे. याव्दारे
संपूर्ण पालिका इमारतीमध्ये विज मिळणार असल्याने नगरपालिकेचे दरवर्षी येणारे
लाखो रूपयांचे विज बिलाची बचत होणार आहे.

याबाबत वृत्त असे कि, सोलर पॅनल बसवीने बाबत नगरपालिका सभेत ठराव
मंजूर झाल्यावर याबाबत निविदा काढण्यात येऊन एका संस्थेस हे काम देण्यात
आले असून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हे काम करण्यात येत आहे. पालिकेच्या
इमारतीवर हे ग्रिड कनेक्टर सोलर बसविण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यावर
संपूर्ण पालिकेचा असणारा विज पुरवठा हा सोलर च्या माध्यमातून होईल. यामुळे
पालिकेची वर्षाकाठी होणारे लाखो रूपयांचे विजबिलाची मात्र बचत होणार आहे,

पालिकेस दर महिन्याला सदर नवीन इमारतीचे बिल १२ ते १३ हजार रुपये इतके
येत असते याप्रमाणे प्रमाणे वर्षास सुमारे १ लाख ५० हजार रूपयांचे विज बिल
पालिका महावितरण कंपनीस भरते मात्र ही सोलर पेनल यंत्रणा कार्यन्वित
झाल्या वर वर्षाकाठी पालिकेची सुमारे दीड लाख रूपयांची विज बिल बचत होणार
आहे, व सोलर पेनल बसून स्वःताची विज निर्मिति करणारी बहुधा सावदा ही
जिल्ह्यातील पहिलीच पालिका ठरणार असल्याचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी
सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!