संभाव्य अतिवृष्टीच्या इशार्.याबाबत रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी प्रशासनाला केले सतर्क

पोलादपूर प्रतिनिधी

29 जुलै

पोलादपूर तालुक्यातील 2005 मध्ये दगड गस्त झालेल्या गावांबद्दल आढावा घेऊन पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी येत्या काही दिवसात राज्यात होणार्‍या अतिवृष्टीचा इशार्.याकडे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पोलादपूर येथील तहसील कार्यालयामध्ये प्रभारी तहसीलदार समीर देसाई, पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अतिवृष्टी पूरग्रस्त आणि दरडग्रस्त गावांच्या मदत कार्य तसेच रस्ते पुनर्निर्माणाचा आढावा ना. अदिती तटकरे यांनी घेतला.

दरडग्रस्त व पुरबाधित गावांच्या यादीनुसार पोलादपूर तालुक्यातील गावांमध्ये कोणत्याही प्रकारची आपत्ती आगामी काळात अतिवृष्टीच्या इशार्.यानुसार ओढवली जाऊ नये, यासाठी सतर्कता बाळगण्याची खबरदारी घेण्यास यावेळी पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी सांगितले.

साखर सुतारवाडी, केवनाळे येथे दरड कोसळली आणि आंबेमाचीवर दरड कोसळण्यापुर्वी नाणेघोळ येथे ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले तशा पध्दतीने येत्या काळात कोणत्याही प्रकारची शक्यता जाणवल्यास नजिकच्या सुरक्षित ठिकाणी ग्रामस्थांना हलविण्यात येऊन सर्व सोयी संभाव्य अतिवृष्टीकाळात देण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री ना अदिती तटकरे यांनी दिले.

यावेळी पुरग्रतांना होणार्‍या मदतीचे अन्नधान्य, चादर तसेच टॉवेलच्या किटचे पॅकेट स्वत: अदिती तटकरे यांनी उघडेन पाहणी केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!