वैद्यकीय शिक्षणक्षेत्रात इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले स्वागत
मुंबई प्रतिनिधी
29 जुलै
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात, ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘इतर मागासवर्गीय गटाच्या विद्यार्थ्याना 27 टक्के आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना ऑॅल इंडिया कोटा योजनेतून पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण प्रवेशासाठी 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो.ङ्ग असे शाह यांनी आपल्या टवीट मध्ये म्हटले आहे.
”ही अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी पूर्ण करुन पंतप्रधानांनी मागास वर्गांच्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कल्याणासाठीची आपली कटिबद्धता दर्शवली आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाचा सुमारे 5,550 विद्यार्थ्याना लाभ होईल.ङ्ग
या निर्णयामुळे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्याना वैद्यकीय प्रवेशांत 27 टक्के तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. याच शैक्षणिक वर्षापासून हे आरक्षण लागू होईल.