देशात सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, लवकरच किमती कमी होण्याची शक्यता?

नवी दिल्ली प्रतिनिधी

29 जुलै

सरकारी तेल कंपन्यांच्या वतीनं आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 17 जुलैनंतर डीझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 17 जुलै रोजी पेट्रोलच्या दरात 29 ते 30 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

आज देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचे दर 101.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आणि डिझेलची किंमत 97.45 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 102.08 रुपये, तर डिझेलचे दर 93.02 रुपये प्रति लिटर आहेत. तसेच, चेन्नईतही पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. चेन्नईत पेट्रोल 102.49 रुपये लिटर आहे, तर डिझेल 94.39 प्रति लिटरनं विकलं जात आहे.

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :

शहरं पेट्रोलची किंमत डिझेलची किंमत

दिल्ली 101.84 89.87

मुंबई 107.83 97.45

चेन्नई 102.49 94.39

कोलकाता 102.08 93.02

बंगळुरु 105.25 95.26

भोपाळ 110.20 98.67

चंदीगड 97.93 89.50

रांची 96.68 94.84

लखनौ 104.25 95.57

लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?

देशात इंधनदरवाढीच्या सत्राला ब-ेक लागून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी जागतिक स्तरांवर तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेंचमार्क ब-ेंट क्रूड ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाढ 77 डॉलर प्रति बॅरल झालं होतं, या किमती मागच्या पंधरवड्यात 10 टक्क्यांहून कमी होत 68.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. जर या किमती आणखी काही दिवसांसाठी 70 डॉलर प्रति बॅरलहून कमी राहिल्या, तर येणार्‍या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट होऊ शकते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!