रावेर मध्ये कपडा बँकेच्या माध्यमातून गरिबांसाठी स्वामी परिवारातर्फे आगळा वेगळा उपक्रम..

निंभोरा प्रतिनिधी:-प्रमोद कोंडे

स्वामी परिवार द्वारा एक आगळा वेगळा उपक्रम रावेर नगरीत सुरू करण्यात आला आहे.कपडा बँक याच्या माध्यमातून कपडा बॅकेचे कार्य मागील सहा वर्षापासून सुरू आहे, या कपडा बँकेच्या माध्यमातून वापरण्यायोग्य कपडे गोळा करुन , त्यांना स्वच्छ धुवून इस्त्री करून पॅकिंग करून ज्यांना आवश्यक आहे त्यांना विनामूल्य वितरीत केले जातात, द-या खो-यात राहणारे गरीब बांधवांना या ऊपक्रमाचा चांगला फायदा होत असतो, आजपर्यंत निमड्या, गारबर्डी, सायबूपाडा,आदी गावांना जावून ही सेवा दिलेली आहे. ब-याच बांधवांनी या कपडा बँकेत वापरण्या योग्य कपडे आणून दिले आहेत त्या सर्वांना या कार्याचे पुण्यलाभ मिळेलच यात शंका नाही, पुढील काळात साधारण तीन महिन्यानंतर येत्या दिवाळीच्या आधी अश्याचप्रकारे कपडे वितरीत करणार आहेत,आपणा सर्वांना स्वामी परिवाराचे अध्यक्ष विनंती करतात की, आपल्या कपाटांमध्ये, पलंगांमध्ये पडून असलेले आपल्याला व आपल्या मुलाबाळांना आखूड झालेले मात्र वापरण्यायोग्य शर्ट, पॅन्ट, साड्या त्यादी कपडे आपण स्वामी शाळेत आणून द्यावे कींवा 9595952221 या क्रमांकावर संपर्क साधावा.आपल्या घरी माणूस पाठवून कपडे संकलन केले जाईल.चला तर एक हात मदतीचा आपण पुढे करू या, आपल्याच बांधवांना आपणच मदत करूया असे आवाहान स्वामी परिवाराचे अध्यक्ष रविंद्र राजाराम पवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!