कटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार

नवी दिल्ली 29 JUL 2021

केनिया येथे 26 जुलै ते 06 ऑगस्ट 21 दरम्यान होणाऱ्या कटलास एक्स्प्रेस 2021 (CE 21) बहुराष्ट्रीय सागरी अभ्यासात भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस तलवार सहभागी होणार आहे. 26 ते 28 जुलै या कालावधीत मोम्बासा येथील बंदर टप्प्यात झालेल्या सरावात भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोजच्या पथकाने (MARCOS) केनिया, जिबौती, मोझांबिक, कॅमरॉन आणि जॉर्जियाच्या तटरक्षक दलाच्या जवानांना प्रशिक्षण दिले. भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोजच्या पथकाने मोम्बासा येथील बांदरी मेरिटाइम अकॅडमी येथे आयोजित सरावादरम्यान सहभागी परदेशी नौदलाच्या खलाशांचाही यात सहभागी होता. त्यांच्या समवेत बोर्डिंग, शोध, जप्ती विषयक कारवाया (व्हीबीएसएस) कृतीत आणण्याचा उत्कृष्ट मार्ग सामायिक केला.

कटलास एक्स्प्रेसच्या अभ्यासाचा दौऱ्याचा उद्देश म्हणजे, प्रादेशिक सहकार्य वृद्धिंगत करणे, सागरी सीमांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पश्चिम हिंदी महासागराकील बेकायदेशीर सागरी कारवाया रोखण्यासाठी अमेरिका, पूर्व आफ्रिकन आणि पश्चिम हिंद महासागर प्रदेशांमधील क्षमता वाढविण्यासाठी शक्य तितक्या उत्तम मार्गाने एकमेकांना सहकार्य करणे हा आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!