सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे 16,597 कोटी रुपयांची बेवारस रक्कम जमा

नवी दिल्ली प्रतिनिधी

28जुलै

सरकारी बँकांकडे 16,596.90 कोटी रुपयांची विना दावा असलेली जमा रक्कम आहे. मंगळवारी संसदेमध्ये याची माहिती  केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली.

देशातील विविध सरकारी बँकाकांडे दावा न करण्यात आलेल्या 16,596 कोटी रुपयांची रक्कम जमा असून येथे कमीत कमी 10 वर्षतील कालावधी दरम्यान उत्पन्न किंवा परिपक्वता रक्कमेचा दावा करण्यात आलेला नाही.

केंद्रिय अर्थराज्यमंत्री भागवत कराडद्वारा राज्यसभेत एका लिखीत उत्तरामध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आंकडेवारीतून हे माहिती पडले  आहे की सार्वजनिक क्षेत्रातील बँका (पीएसबी) मध्ये दावा न करण्यात आलेल्या जमा रक्कम 5.47 कोटीपेक्षा अधिक खात्यांमध्ये आहेत.

डिसेंबर 2020 पर्यंत खाजगी बँकांमध्ये दावा न करण्यात आलेली जमा रक्कम 88.67 लाख खात्यांमध्ये 2,963.54 कोटी रुपये होती. आंकडेवारीतून माहिती पडते की भारतीय स्टेट बँक (एसबीआय) कडे एकूण 3,577.56 कोटी रुपयांची बेवारस रक्कम जमा होती.

2020 पर्यंत क्षेत्रीय ग-ामीण बँकांमध्ये अशा प्रकारची जमा रक्कम 601.15 कोटी रुपये होती. विदेशी बँकांकडे 612.33 कोटी रुपये रक्कम विना दाव्याची जमा आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा उपलब्ध करण्यात आलेल्या आंकडेवारीचा हवाला देत मंत्र्यांनी म्हटले की 2020 च्या शेवट पर्यंत अनुसूचित वाणिज्यीक बँकांमध्ये बेवारस जमेची एकूण रक्कम 24.356.41 कोटी रुपये होती.

कराड यांनी सांगितले की जमाकर्त्यांद्वारा बँकांकडून आपल्या जमा रक्कमेचा दावा करण्यात न आल्याच्या कारणामुळे वर्ष 2019 च्या तुलनेत वर्ष 2020 मध्ये बेवारस जमा रक्कमेत 5,977 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

त्यांनी म्हटले की केंद्रिय बँकेने बँकाना विना दावा जमा किंवा निष्क्रिय खात्यांच्या खातेधारकांच्या ठिकाणांची माहिती घेण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका निभावण्याचा सल्ला दिला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!