राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन नोंदणी करुन लाभ घेण्याचे आवाहन

जालना प्रतिनिधी

27 जुलै

सन 2014-15 पासुन सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. सन 2018-19 पासून या अभियानात व पौष्टिक तृणधान्य समावेश करण्यात आला असुन लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन नोंदणी करुन लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

योजनेचा उद्देश : क्षेत्रविस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकर्‍यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ करणे, जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविणे,शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावणे.

योजनेची व्याप्ती : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – अन्नधान्य, कडधान्य, भरडधान्य (मका), पौष्टिक तृणधान्य, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -नगदी पिके, कापूस, ऊस अभियानामध्ये राबविण्यात येणार्‍या बाबी : पीक प्रात्यक्षिके – पीक प्रात्यक्षिके, पीक पद्धतीवर आधारीत प्रात्यक्षिके (आंतरपिक) इ, प्रमाणित बियाणे वितरण व बियाणे उत्पादनास अर्थसहाय्य एकात्मिक कीड व अन्नद्रव्ये व्यवस्थापन, सुधारित कृषि औजारे व सिंचन साधन, पीक पध्दतीवर आधारीत प्रशिक्षण, वैशिष्ट्यपूर्ण बाबी-शेतकर्‍यांचे शेतमालाचे मुल्यवर्धनासाठी मिनी दाल मिल (शेतकरी गटासाठी), इ. घटकांची स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत अंमलबजावणी केली जाते.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्यनगदी पिके सन 2021-22 अंतर्गत रब्बी हंगामामध्ये कडधान्य, व तृणधान्य या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके,सुधारित कृषि औजारे व सिंचन साधने या बाबींचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकर्‍यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत, महा-डीबीटी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकर्‍यांमधून मंजूर कार्यक्रमाच्या मर्यादेत लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांसाठी कृषि विभागाच्या हीींिं://ज्ञीळीहळ.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या वेबसाईट ला भेट द्यावी व याबाबत अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!