ईशान्येकडील परिस्थितीला अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्रीच जबाबदार, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

कराड

27 जुलै

आसाम – मिझोराम सीमेवर उद्भवलेल्या परिस्थितीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्माच जबाबदार असल्याचा आरोप काँग-ेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टिवटद्वारे केला. तसेच, पंतप्रधानांनी आंतर राज्य परिषदेची बैठक बोलावून ईशान्येकडील राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित केली पाहिजे, असेही चव्हाण यांनी आपल्या टिवटमध्ये म्हंटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्?याच्या दोन दिवसांनी (सोमवारी) वादग-स्त आसाम – मिझोराम सीमेवर हिंसाचार भडकला. आसाममधील कच्छर जिल्हा आणि मिझोराममधील कोलासिब जिल्ह्याच्या सीमेवरील भागात गोळीबार झाला. यामध्ये 5 पोलीस ठार झाले, तर मूळचे पुण्याचे असलेले कच्छरचे पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर हे सुद्धा गोळीबारात जखमी झाले. जखमी निंबाळकर आणि अन्य पोलीस लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या टिवटमध्ये केली आहे. ईशान्येकडील हिंसाचाराला शहा आणि आसामचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने आंतर राज्य परिषदेची बैठक बोलावून शांतता प्रस्थापित केली पाहिजे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या टिवटमध्ये केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!