एकदिवशीय मालिकेतील पराभवानंतर पोलार्डकडून खराब खेळपट्टी बाबत नाराजी
वारबाडोस
27जुलै
ऑस्ट्रेलिया विरुध्द एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने झालेल्या पराभवानंतर वेस्टइंडिजचा कर्णधार कीरोन पोलार्डने खेळपट्टींच्या गुणवत्तेवर नाराजी व्यक्त केली आहे.
तिसर्या एकदिवशीय सामन्यात सहा गडी राखून झालेल्या पराभवानंतर कर्णधार पोलार्डने म्हटले की बारबाडोसला आल्यानंतर मला वाटले की दोनीही संघ या खेळपट्टीवर संघर्ष करतील आणि मला वाटले की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे अस्वीकार्य आहे.
त्याने म्हटले की आम्ही कोणताही बहाना देत नाहीत मात्र आम्ही या गोष्टीला स्वीकार्य करतोत की आम्ही चांगल्या प्रकारची फलंदाजी केली नाही. परंतु आंतरराष्ट्रीय संघासाठी ही धावसंख्या चांगली होती असे मला वाटत नाही. सेंट लुसियाहून येथे येणे माझ्या मते हास्यास्पद आहे.
पोलार्डने म्हटले की विनाकारण खराब खेळपट्टींवर खराब धावसंख्येसाठी खेळाडूंना जबाबदार ठरविले जात आहे.