युनेस्कोने धोलावीराला जागतिक वारसा स्थळ घोषित केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
नवी दिल्ली, 27 जुलै 2021
युनेस्कोने भारतातील हडप्पाकालीन शहर असलेल्या धोलावीरा या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. विशेषत: इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी हे नक्कीच भेट देण्यासारखे स्थळ आहे, असेही ते म्हणाले.
युनेस्कोच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटच्या शृंखलेतून सांगितले की,
“या बातमीने अत्यंत आनंद झाला.
धोलावीरा हे एक महत्त्वाचे शहरी केंद्र होते आणि हे आपल्या भूतकाळाशी संबंधित असलेला सर्वात महत्वाचा दुवा आहे. विशेषत: इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी हे नक्कीच भेट देण्यासारखे स्थळ आहे.
विद्यार्थीदशेत असताना मी प्रथम धोलावीराला गेलो होतो आणि ते स्थळ पाहून मी मंत्रमुग्ध झालो होतो.
गुजरातचा मुख्यमंत्री या नात्याने मला धोलावीरातील वारसा संवर्धन आणि पुनर्स्थापनेशी संबंधित पैलूंवर काम करण्याची संधी मिळाली.आमच्या चमूने तेथे पर्यटन अनुकूल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी देखील कार्य केले.”