पुरगस्तांना राष्ट्रवादीचे मंत्री, खासदार, आमदार एक महिन्याचे देणार वेतन, अजितदादांची घोषणा
मुंबई प्रतिनिधी
26 जुलै
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे लोकांचं अतोनात नुकसान झालं आहे. या अस्मानी संकटात मदत करण्यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री, राज्यमंत्री सर्व खासदार, आमदार, एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री रिलीफ फंडात संकटग-स्त लोकांसाठी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग-ेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूराने कोकण, सातारा, सांगली याठिकाणी अपरिमित हानी झाली आहे. दरड कोसळून जवळपास251 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 100पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. यासह मुंबई, पुणे, अमरावती याठिकाणीही पूराने परिस्थिती अवाक्याबाहेर गेली होती. या नुकसानग-स्त लोकांना एसडीआरएफच्या नियमानुसार मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
’सरकार आपल्यापरीने मदत करेल परंतु, राष्ट्रवादी काँग-ेसच्या माध्यमातून आणखी मदत देता येईल का याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सर्वांशी चर्चा करुन घेत आहेत. त्यामुळे एक-दोन दिवसात नेमकी मदत काय देणार आहे, हे पक्षाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा पूरग-स्त दौर्यावर आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एनडीआरएफ, नेव्ही, आर्मी यांची मदत घेऊन बचाव कार्य सुरू आहे. या घटनेत ज्यांचा जीव गेला आहे, त्यांना 5 लाख रुपयांची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. मुंबईत जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांनाही पैसे वाटप झाले आहेत, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.
’या महापुराने घरं उद्ध्वस्त झाली. शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले शिवाय शेतकर्यांची जनावरेही वाहून गेली. येत्या कॅबिनेटमध्ये यावर निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल, असेही नवाब मलिक म्हणाले.
’संकटे येतात त्यावेळी सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी असते एकसंघ येऊन मदत करण्याची परंतु, मुख्यमंत्री केंद्र सरकार मदत करत आहे. हे सांगत आहेत यामध्ये ते कोणतेही राजकारण करत नाहीत. मात्र भाजपचे नेते नको ती भाषा करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे चिरंजीव टवीट करुन जी भाषा वापरत आहेत ते योग्य नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.
’नारायण राणे हे पूरग-स्तठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आम्ही मुख्यमंत्री पदाच्या वेटींगमध्ये आहोत, असे वक्तव्य करत आहेत. सर्वांनी संकटकाळात मदत केली पाहिजे मात्र भाजपचे केंद्रीयमंत्री असं बोलतात हे योग्य नाही, असा टोलाही मलिक यांनी लगावला.