संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ताजिकिस्तानमधील एससीओ या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार

नवी दिल्ली, 27 जुलै 2021

प्रमुख वैशिष्ट्ये:

  • संरक्षण मंत्री आज दुशांबेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत
  • उद्या ते एससीओ संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करणार
  • सदस्य देशांमध्ये संरक्षण सहकार्याच्या मुद्यांवर चर्चा
  • संरक्षणमंत्र्यांची ताजिक मधील आपल्या समपदस्थांशी भेट होणे अपेक्षित

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या वार्षिक बैठकीस उपस्थित राहण्यासाठी, दिनांक 27-29 जुलै 2021 या कालावधीत ताजिकिस्तानमधील दुशांबेला भेट देणार आहेत. या वार्षिक बैठकीत एससीओ सदस्य देशांमधे संरक्षण सहकार्यच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे आणि चर्चा झाल्यानंतर निवेदन जाहीर होण्याची शक्यता आहे. या सभेत राजनाथ सिंह 28 जुलै 2021 रोजी बैठकीला संबोधित करतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!