शरथ कमल गतविजेता ऑॅलिम्पिक चॅम्पियनशी भिडणार

टोकियो

26 जुलै

भारताचा अनुभवी टेबल टेनिस स्टार अचंता शरथ कमल याने टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये पुरूष एकेरीची तिसरी फेरी गाठली आहे. तिसर्‍या फेरीत त्याचा सामना गतविजेत्या खेळाडूंशी होणार आहे.

शरथ कमल याने टोकियो मेट्रोपॉलिटन जीम टेबल नं1 वर झालेल्या दुसर्‍या फेरीतील सामन्यात पोर्तुगालच्या टियागो अपोलोनिया याचा पराभव केला.

शरथ कमलचे हे चौथे ऑॅलिम्पिक आहे. त्याने दुसर्‍या सामना 49 मिनिटात 2-11, 11-8, 11-5, 9-11, 11-6, 11-4 असा जिंकला.

शरथ कमलने पहिला गेम अवघ्या चार मिनिटात 2-11 असा गमावला. त्यानंतर त्याने शानदार वापसी करत पुढील दोन गेम जिंकत 2-1 अशी बढत घेतली. पण टियागोने चौथा गेम जिंकत स्कोर 2-2 केला.

2004 मध्ये ऑॅलिम्पिक डेब्यू केलेल्या शरथ कमलने सामना जिंकण्यासाठी आपला अनुभव पणाला लावला आणि पुढील दोन गेम जिंकत सामना 4-2 ने आपल्या नावे केला.

दरम्यान, शरथ कमलने मागील वर्षी ओमान ओपन स्पर्धा जिंकली होती. याआधी कोरोनामुळे सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. कमल लॉकडाउनच्या काळात चेन्नईमधील आपल्या घरात जोरदार सराव करत होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!