पराभवानंतर भवानी देवीने देशवासियांना म्हटलं, ’मला माफ करा’
टोकियो
26 जुलै
टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये भारतीय तलवारबाज सीए भवानी देवीचे, आव्हान दुसर्या फेरीत संपुष्टात आले. पहिल्या फेरीत दमदार विजय मिळवणारी भवानी देवी दुसर्या फेरीत फ्रान्सच्या मॅनॉन ब-ुनेटकडून पराभूत झाली. मॅनॉनने हा सामना 15-7 अशा फरकाने जिंकला. भवानी देवीने पहिल्या सामन्यात ट्युनिशियाच्या नादिया बेन अजिजीचा 15-3 ने धुव्वा उडवला होता. विशेष म्हणजे भवानी देवीने हा फक्त सहा मिनिटे 14 सेकंदांमध्ये जिंकला.
दरम्यान, दुसर्या फेरीतील पराभवानंतर भवानी देवी निराश झाली आणि तिने देशवासियांची माफी मागितली. भवानी देवीने एक टिवट केलं आहे. त्यात ती म्हणते, ’हे खूप उत्साही आणि भावूक होतं. मी नादियाविरुद्धच्या सामना 15-3 अशा फरकाने जिंकत ऑॅलिम्पिकमध्ये सामना जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरले. पण दुसर्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानावर असलेल्या मॅनॉन ब-ुनेटकडून 7-15 ने मी पराभूत झाले. पण मी माझं सर्वश्रेष्ठ दिलं. तरी देखील मी जिंकू शकले नाही. मला माफ करा.’
सीए भवानी देवीने टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव खेळाडू आहे. तिचे हे पहिलं ऑॅलिम्पिक असून तिने पहिला सामना जिंकला. अशी कामगिरी करणारी भवानी देवी भारताची एकमात्र तलवारबाज आहे. भवानी देवीचे टोकियो ऑॅलिम्पिकमधील आव्हान जरी संपुष्टात आले तरी तिने करोडों भारतीयांची मने जिंकली आहेत.