आरत्यांचा अर्थ सांगणारे “अचूक अर्थारती” पुस्तकांचे आज संतांच्या उपस्थितीत प्रकाशन

सावदा प्रतिनिधी –

सावदा येथील प्रा. व.पु. होले यांनी अचूक अर्थारती हे पुस्तक लिहिले असून याचा प्रकाशन सोहळा आज अंजाळे येतील गुरूवर्य जगन्नाथ महाराज समाधीस्थळी पार पडला.

भाविक सर्व आरत्या अचूकपणे म्हणत नाहीत. या पार्श्‍वभूमिवर, प्रचलीत असणार्‍या आरत्यांचा अचूक उच्चार आणि अर्थ समजून सांगणारे “अचूक अर्थारती” हे पुस्तक सावदा येथील प्रा. व.पु. होले यांनी लिहले असून याचे अंजाळे ता. यावल येथील गुरूवर्य जगन्नाथ महाराज समाधीस्थळी प्रकाशन करण्यात आले.

याअगोदर प्रा. व.पु. होले यांनी टर्निंग पोइंट नावाचा कथा संग्रह तीन आवूत्यांसह तसेच झुंज एका मृत्यूशी, व इचार करू सुंदरे भो हे लेवा गणबोलीतील पुस्तक आदी पुस्तके त्याची प्रकाशित झाली आहेत.

प्रा. व.पु. होले यांनी बोलताना सांगितले कि, मी समाजात बरेच लोक पाहिले जे गणेश उस्सव, नवरात्री उस्सव, वा मंदिरात जेव्हा सुधा त्यांच्या आरत्या म्हणतात किंवा त्यांच्या आरत्या ऐकल्या जातात तेव्हा बऱ्याच लोकांच्या तोंडातून चुकीचे शब्द एकू येत असल्याचे मी पाहिले. त्या वेळेला मी लिखित पुस्तकात पाहण्याचा प्रयत्न केला पण तिथे सुद्धा काही चुकीचे शब्द आढळून आले. जगामध्ये सर्वात वरच्या जागेमध्ये आपली हिंदू संस्कृती असताना अलीकडे सर्व प्रगतशील असताना आपल्या जवळ अचूक आरती असू नये किवा आपल्याला म्हणता येऊ नये, हे मला थोड खचकले आणि मग आपण सर्व आरत्यांची अर्थासगट मांडणी करून लोकांपर्यंत मोफत पोहचविण्याचा संकल्प केला केला. आणि शेवटी बऱ्याच मेहनती नंतर हे पुस्तक तयार झाले.

प्रकाशन सोहळ्या दरम्यान महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, शास्त्री भक्तीकिशोरदास, हभप धनराज महाराज, सुशुत हॉस्पितल चे डॉ. व्ही. जे. वारके आदी मान्यवर आणि भाविकांच्या उपस्थितीत हा प्रकाश सोहळा पार पडला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!