पूर ओसरल्यानंतर भारतीय नौदलाच्या पूरस्थितीत बचावकार्य करणाऱ्या पथकाने नागरिकांना आपत्तीतून सावरण्यासाठी केली मदत

मुंबई 26 जुलै 2021

भारतीय नौदलातील पश्चिमी नौदल कमांडच्या पूरस्थितीत बचावकार्य करणाऱ्या सात पथकांची रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये नेमणूक करण्यात आली असून पुरामुळे अनेक अडचणींना तोंड देणाऱ्या स्थानिक नागरिकांना मदत करून सावरण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

गेल्या दोन दिवसांत 200 हून अधिक कुटुंबांना लगेच खाण्यासाठी तयार  स्वरूपाच्या अन्नाची पाकिटे पुरविण्यात आली आहेत. या भागातील गरजूंना आपत्कालीन प्रथमोपचार आणि सामान्य उपयोगाची औषधे देखील पुरविण्यात येत आहेत.

पूर ओसरल्यानंतर त्या भागात साचलेला चिखल आणि इतर कचरा स्वच्छ करण्याच्या कामी देखील नौदलाच्या पथकांनी स्थानिक नागरिकांना मदत केली.

बचाव कार्य पूर्ण करून  ही पथके आज 26 जुलै रोजी मुंबईत परत येणार आहेत आणि या पुढील काळात आवश्यक असलेल्या मदतीला धावून जाण्यासाठी ही पथके सदैव सुसज्ज स्थितीत राहणार आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!