जातिवाचक वक्तव्यानंतर सोशल मीडियात ट्रोल झाला सुरेश रैना
चेन्नई प्रतिनिधी
21 जुलै
माजी क्रिकटपटू सुरेश रैना आपली ओळख ही उच्चवर्णीय जातीची असल्याचे सांगितल्यामुळे वादाच्या भोवर्यात सापडला आहे. सुरेश रैनाने आपण ब-ाह्मण असल्यामुळे दक्षिण भारतीय संस्कृतीशी मिसळलो गेल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर सुरेश रैनाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्याने माफी मागावी, अशी मागणी करत अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे.
तामिळनाडू प्रीमियर लीगचा पाचवा सीजन सुरु आहे. त्या दरम्यान एका व्हिडीओच्या माध्यमातून सुरेश रैना गप्पा मारत होता. एका कमेंटेटरने सुरेश रैनाला विचारले की, तो दक्षिण भारतीय संस्कृतीशी कशा प्रकारे मिसळला आहे. त्यावर सुरेश रैना म्हणाला की, मला वाटते मी ब-ाह्मण आहे. मी चेन्नई शहरात 2004 सालापासून खेळत आहे. मला येथील संस्कृतीशी प्रेम आहे, माझ्या सहकार्यावंर माझे प्रेम आहे. मी अनिरुद्ध श्रीकांत सोबत खेळलो आहे, बद्री आणि बालाभाई सोबतही खेळलो आहे. मी भाग्यशाली आहे की मी चेन्नईचा हिस्सा आहे.
2008 सालापासून सुरेश रैना हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. आता आपल्या जातीची ओळख सांगितल्याबद्दल त्याला सोशल मीडियात चांगलेच ट्रोल केले जात आहे. या प्रकरणी सुरेश रैनाने माफी मागावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. सोशल मीडियावर एका चाहत्याने लिहिले आहे की, सुरेश रैना, तू एवढी वर्ष चेन्नईच्या संघासोबत राहूनही खर्या अर्थाने चेन्नईची संस्कृती शिकला नाहीस.
चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील अधिकार्यांनी सुरेश रैनाच्या या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आयपीएल 2020 च्या सीजनमध्ये सुरेश रैना ‘वैयक्तिक कारण’ असल्याचे सांगत दुबईतून मायदेशी परतला होता. चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापन रैनाच्या या निर्णयावर नाराज होते. असे असले तरीही रैनाला 2021 च्या सीजनमध्ये पुन्हा संधी देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता.