माथाडी कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही – श्री. राजन म्हात्रे
मुंबई प्रतिनिधी
20 जुलै
आज दिनांक 20 जुलै 2021 रोजी अखिल भारतीय माथाडी, सुरक्षा रक्षक, श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियन, अखिल भारतीय माथाडी कामगार सहकारी पतपेढी मर्यादितचे अध्यक्ष व माथाडी कामगार नेते श्री राजन म्हात्रे यांचा 55 वा वाढदिवस संघटनेच्या नवी मुंबई येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमास संघटनेचे सरचिटणीस श्री. अरुण रांजणे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष श्री. हिराजी पाटील, संघटनेचे संयुक्त सरचिटणीस श्री आदित्य म्हात्रे, श्री सुरेश शेळके, श्री जगदिश भगत, खजिदार श्री. अशोक गायकवाड, कार्यकर्ते श्री. चंद्रकांत भाकरे, बाळू मगदूम,
श्री. सदाशिव गायकवाड, श्री. लालासो शेख, विनोद बाबर, संतराम गोयकर, श्री. देविदास बोराडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना श्री रांजणे यांनी असे सांगितले कि, आपल्या संघटनेने नुकतेच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला असून संघटना बळकट करण्यामध्ये आपल्याला पक्षनेतृत्वाने पूर्णपणे ताकद देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे भविष्यामध्ये माथाडी कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीने संघटना कोणत्याही पातळीवर कमी पडणार नाही.
यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. हिराजी पाटील यांनी कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले कि, श्री राजन म्हात्रे व श्री अरुण रांजणे हे दोन्ही नेते, ज्या पद्धतीने रामिष्टे साहेब कामगारांना न्याय मिळवून देत होते त्याच पद्धतीने माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे कामगार बंधूनी त्यांचे हात बळकट करण्याचे काम करावे.
सत्काराला उत्तर देताना श्री. राजन म्हात्रे यांनी उपस्थितांना भावनिक आव्हान दिले. हा सत्कार माझा नसून आपणा सवार्ंचा आहे. त्याच प्रमाणे आपण सवार्ंनी मला व श्री. रांजणे यांना आजपयर्ंत सहकार्य केले तसेच सहकार्य भविष्यामध्ये करत राहावे. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आपल्या संघटनेच्या पाठीशी असल्यामुळे व हि संघटना काँग्रेस ची असल्याची मान्यता मिळाल्यामुळे आम्ही कोणत्याही कामगारावर अन्याय होऊ देणार नाही असे श्री. राजन म्हात्रे म्हणाले.
संघटनेचे संयुक्त सरचिटणीस श्री. सुरेश शेळके यांनी कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.